आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीत जमा नोटांची अद्याप मोजणी सुरूच, RBI गव्हर्नर पटेलांनी संसदीय समितीसमोर सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरबीआय गव्हर्नर 17 जुलै रोजी संसदेसमोर रिपोर्ट सादर करतील. - Divya Marathi
आरबीआय गव्हर्नर 17 जुलै रोजी संसदेसमोर रिपोर्ट सादर करतील.
 नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर लोकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या किती जुन्या नोटा जमा केल्या, त्याचा अचूक आकडा रिझर्व्ह बँक अजूनही सांगू शकलेली नाही. रिझर्व्ह बँकेची एक विशेष कमिटी आता या नोटांची २४ तास मोजणी करत आहे. या कामावर असलेल्या लोकांना रविवार सोडून एकही सुटी देण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी एका संसदीय समितीसमोर ही माहिती दिली आहे. नोटाबंदीनंतर पटेल दुसऱ्यांदा एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीसमोर हजर झाले होते.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन तासांत या समितीने पटेल यांना नोटाबंदीसंदर्भात अनेक प्रश्न विचारले. समितीचे सदस्य सपाचे नरेश अग्रवाल आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी विचारले की, नोटाबंदीनंतर किती नोटा परत व्यवहारात आल्या आहेत? यावर आठ नोव्हेंबर रोजी नाेटाबंदीच्या निर्णयानंतर १७.७ लाख कोटी नोटा परत घेतल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत १५.४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात आल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या नोटा अजूनही नेपाळहून येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सहकारी बँकांकडे जमा असलेल्या नोटा स्वीकारण्याचीही परवानगी देण्यात येत आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा अजून आरबीआयकडे जमा करण्यात आलेल्या नाहीत.
बातम्या आणखी आहेत...