आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी : नियमात बदलाने मोठ्या व्यापाऱ्यांची चिंता वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये रिटर्न दाखल करण्याच्या कालावधीत बदल करण्यात आले असून यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांचा पैसा जीएसटी नेटवर्कमध्ये अडकण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. परिषदेच्या निर्णयानुसार १.५ कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना  आता दर तीन महिन्यांनी परतावा दाखल करावा लागणार आहे, तर त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना दर महिन्याला परतावा दाखल करावा लागेल. यामुळे ९०% व्यापाऱ्यांना दरमहा परतावा दाखल करण्यापासून सुटका मिळणार असून जीएसटी नेटवर्कवरील ओझेदेखील कमी होईल.नियमातील बदलांमुळे जर छोट्या व्यापाऱ्याचा परतावा दाखल होईपर्यंत इनपुट क्रेडिट घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार  असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...