आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी हेल्पलाइनवर रोज 10 हजारांपेक्षा जास्त कॉल, कॉल सेंटरमधील एजंटची संख्या वाढवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - जीएसटी नेटवर्कच्या हेल्पलाइनवर रोज १० हजारांपेक्षा जास्त कॉल येत आहेत. नेटवर्कवर पहिली रिटर्न फायलिंग सप्टेंबरमध्ये होईल. त्यावेळी कॉलची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने कॉल सेंटरमधील एजंटची संख्या २०० वरुन ४०० करण्यात आली आहे. ०१२०-४८८८९९९ हेल्पलाइन क्रमांक २५ जूनला सुरू झाले. 
 
जीएसटीएनचे अध्यक्ष नवीन कुमार यांच्या मते, हेल्पलाइनवर नोंदणी प्रक्रिया, पासवर्ड पुन्हा तयार करणे इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. हेल्पलाइनवर एजंट उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास ते प्रश्न सुपरवायझरला पाठवले जाते. त्यांच्याकडूनही समाधान न झाल्यास जीएसटीएन तज्ज्ञ त्याचे उत्तर देतात. कुमार पुढे म्हणाले, कर व्यवस्था व तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्यांची नियुक्ती केली जात आहे. एजंटकडे फायनान्स किंवा टॅक्स सर्टिफिकेशनची पदवी आवश्यक आहे.    
 
प्रसादावर कोणतेही शुल्क नाही  : धार्मिक संस्थांकडून वितरित केल्या जाणाऱ्या भोजन व प्रसादावर कोणताही कर नसेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. याबाबत वृत्त माध्यमात आल्याने वित्त मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले. प्रसाद बनवण्यासाठी लागणारे साहित्य, साखर, तेल, तूप, लोणी इत्यादीवर कर आहे.
बातम्या आणखी आहेत...