आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी : सध्याच्या तुलनेत कराचे ओझे वाढेल; नजीब शाह यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या नवीन कर प्रणालीत पाच वर्षांत कर कमी होण्याची कोणतीच अपेक्षा नाही. या उलट लोकांवर कराचे ओझे सध्याच्या तुलनेत थोडेफार वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय उत्पादन तथा आयात शुल्क मंडळ (सीबीईसी) चे अध्यक्ष नजीब शाह यांनी विशेष चर्चेदरम्यान ही माहिती दिली आहे.  

कर टप्प्यांच्या हिशेबात वस्तू आणि सेवांचे वर्गीकरण करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटी परिषदेने ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के दर निश्चित केले आहेत. यासह काही निवडक वस्तूंवर सेसदेखील लागेल. सेससह जास्तीत जास्त कर ४० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. यामध्ये २० टक्के केंद्र, तर २० टक्के राज्यांचे असतील. पाच वर्षांपर्यंत राज्यांच्या महसुलाला नुकसान झाल्यास त्याची भरपाई सेसच्या माध्यमातून होणार आहे.  केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटीमधील किमान कर दर २८ टक्क्यांवरून वाढवून ४० टक्के करण्यात आला असल्याचे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी अलीकडेच सांगितले होते. यामध्ये कोणताच बदल झालेला नाही. 
बातम्या आणखी आहेत...