आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत होणार सर्वात मोठा दूध उत्पादक; गहू, तांदळाच्या उत्पादनातही 16 % वाढ होण्याचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१० वर्षांत भारतात वाढणार ४२ टक्के दूध उत्पादन - Divya Marathi
१० वर्षांत भारतात वाढणार ४२ टक्के दूध उत्पादन
संयुक्त राष्ट्र  - पुढील दशकात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार आहे. त्याचबरोबर २०२६ पर्यंत हा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन होणारा देशदेखील बनणार आहे. गहू उत्पादनातही जागतिक पातळीवर सर्वाधिक वाढ भारतात होणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र आणि आर्थिक सहयोग आणि विकास संघटना (ओईसीडी) च्या एका संयुक्त अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  
 
एका दशकात जगाची लोकसंख्या ७.३ अब्जांनी वाढून ८.२ अब्जांपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज “ओईसीडी-एफएओ अॅग्रिकल्चरल आऊटलूक २०१७-२०२६’ मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. लोकसंख्येतील ५६ टक्के वाढ ही भारत आणि उपसहारा आफ्रिकी देशांमध्ये होणार आहे. लोकसंख्येतील वाढीमुळे हे क्षेत्र जगातील सर्वात जास्त मागणी निर्माण करणारे क्षेत्र ठरणार आहे. दहा वर्षांत भारतातील लोकसंख्या सध्याच्या १.३ अब्जावरून २० कोटींनी वाढून १.५ अब्ज होणार आहे. २०२६ पर्यंत चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश ठरणार असल्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  
 
२१ व्या शतकाच्या सुरुवातीला २५ वर्षांतच भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश होणार असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. २०२६ मध्ये भारतातील दूध उत्पादन ४२ टक्क्यांनी वाढणार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर युरोपीय संघ राहील. गहू आणि तांदूळ उत्पादनातही भारतात सुमारे १६ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. क्षेत्रीय आणि जागतिक आधारावर भारतातील उत्पादनात सर्वाधिक वाढ होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...