आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय: पतधोरणाचा आज आढावा; कर्ज स्वस्त होण्यास महागाई, मान्सूनचा खोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्ज स्वस्त होण्याच्या रस्त्यात पुन्हा एकदा महागाईचा खोडा आला आहे. अशा स्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेला उद्योजक आणि सरकारच्या अपेक्षा पूर्ण करणे सोपे वाटत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महागाई दर जून महिन्यात आठ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. असे झाल्यास उद्योग जगताला मोठा धक्का बसेल. उद्योजक सध्या व्याजदर कपातीची आशा करत आहेत. याआधी जून महिन्यात आरबीआयने व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली होती. तरीदेखील आणखी व्याजदर कपात करण्याची मागणी जोर धरत आहे.

जून महिन्यात घाऊक महागाई दर ५.५४ टक्क्यांसोबत गेल्या आठ महिन्यांतील सर्वाेच्च पातळीवर आहे. व्याजदरात कपात करण्यासाठी आरबीआयच्या वतीने या आकडेवारीचा आधार घेतला जातो. एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्याकांती घोष यांनी सांगितल्याप्रमाणे खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये झालेल्या भाववाढीमुळे महागाई दरावर परिणाम झाला आहे.

उद्योजकांची मागणी
औद्योगिक क्षेत्राचा विचार केल्यास सध्या उत्पादनाचा विकासदर २.७ टक्के आहे. एप्रिलमध्ये तो ३.४ टक्के होता, तर अन्नधान्य तसेच डाळींच्या किमती २२ टक्के वाढल्याने महागाई दर वाढला आहे. अशा स्थितीत मान्सूनवर बरेच काही अवलंबून राहणार आहे. मात्र, उत्पादनात आलेली मंदी घालवायची असेल तर व्याजदर कमी होणे आवश्यक असल्याचे मत सीआयआयचे कार्यकारी अधिकारी चंद्रजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...