आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसुलात 1.7% वाढ : इन्फोसिसचा नफा वाढला; बड्या ग्राहकांचा आधार, भारतावर परिणाम नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - अमेरिकेमध्ये व्हिसा मिळवण्यात वाढलेल्या अडचणी आणि संस्थापकांनी केलेल्या कडवट टीकेदरम्यान इन्फोसिसने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनीच्या नफ्यात जून तिमाहीमध्ये १.३ टक्क्यांची वाढ 
झाली आहे.  
 
एप्रिल-जूनमध्ये कंपनीला ३,४८३ कोटी रुपयांचा नफा झाला, जो वर्षभरापूर्वी ३,४३६ कोटी रुपये होता. महसूल १६,७८२ कोटींवरून १.७ टक्क्यांनी वाढून १७,०७८ कोटी रुपये झाला आहे. उत्तरी अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक मोठे ग्राहक मिळाल्यामुळे प्रदर्शनामध्ये ही सुधारणा दिसून आली आहे. गेल्या तीन महिन्यांत १० कोटी डॉलरपेक्षा जास्तीचे कंपनीने आठ ग्राहक जोडले आहेत. प्रती शेअरचा नफा १५.२४ रुपये आहे, २०१६ च्या जून तिमाहीमध्ये हा १५.०३ रुपये होता. प्रती कर्मचारी महसुलात सलग सहाव्या तिमाहीमध्ये वाढ झाली आहे. डॉलरच्या दृष्टीने महसूल ६ टक्के तर नफा ५.८ टक्क्यांनी वाढला आहे. असे असले तरी जानेवारी -मार्चच्या तुलनेत नफ्यात ३.३ टक्के आणि महसुलात ०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. कर्मचाऱ्यांना खूपच चांगला “व्हेरिएबल पे’ दिला असल्याने मार्जिनवर १ टक्के परिणाम झाला असल्याची माहिती कंपनीचे सीएफओ एमडी रंगनाथन यांनी सांगितले. ही पगारवाढ याच महिन्यापासून लागू होणार आहे. एक दिवस आधीच टीसीएसने डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे नफ्यात ५.९ टक्क्यांची घट झाली असल्याची घोषणा केली होती.
 
वार्षिक महसूल वाढीचा अंदाज १% वाढवला 
 कंपनीने डॉलरच्या दृष्टीने वार्षिक महसुलातील वाढीचा अंदाज ६.१ ते ८.१ टक्क्यांवरून वाढवून ७.१ ते ९.१ टक्के केला आहे. रुपयामध्ये महसुलातील वाढीचा अंदाजदेखील २.५ ते ४.५ टक्क्यांवरून वाढवून ३ ते ५ टक्के केला आहे. बाजाराच्या दृष्टीने ही सर्वाधिक आश्चर्यकारक बातमी होती. 
 
कर्मचारी संख्या १,१८१ ने घटली  
एप्रिल ते जूनमध्ये १००० पेक्षा जास्त लोकांनी कंपनी ज्वाइन केली. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १,९८,५५३ झाली. तरी मार्च तिमाहीच्या तुलनेत हा १,८११ ने कमी आहे. ऑटोमेशनमुळे ११,००० कर्मचाऱ्यांना काढणार असल्याचे म्हटले होते.
 
 - ३९,३३५ कोटी रुपये नगदी आहेत कंपनीकडे. ३१ मार्च रोजी ३८,७७३ कोटी रुपये होते.
 - २४.१ % वर स्थिर ऑपरेटिंग मार्जिन. टीसीएसचा २% कमी होऊन २३.४% आला होता.
 
भारतावर परिणाम नाही  
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी सांगितले की, इन्फोसिस दोन वर्षांत अमेरिकेमध्ये १०,००० नवीन कर्मचारी भरती करणार आहे. मात्र, त्यामुळे भारतातील भरतीवर त्याचा परिणाम होणार नाही. कंपनी येथे इतका रोजगार सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत देते. या वर्षी १९,००० लोकांना कँपस ऑफर देण्यात आली आहे. १२ ते १३ हजार कर्मचारी ज्वाइन करतील अशी अपेक्षा आहे.  
 
सीएफओ रंगनाथन अमेरिकेत स्थलांतरित होणार  
कंपनीचे सीएफओ एमडी रंगनाथन आता अमेरिकेमधून कारभार पाहणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. तीन वर्षांपूर्वी सिक्का यांनी इन्फोसिसमध्ये कामाला सुरुवात केली होती, त्या वेळीही ते अमेरिकेतच होते.
बातम्या आणखी आहेत...