आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांनी सतर्क रहावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात (बुधवार ते मंगळवार) तेजी नोंदवण्यात आली.  मोजक्या शेअरमध्ये फंडाच्या वतीने खरेदी होण्याची शक्यता आहे. वाढ कायम राहील या अपेक्षेमध्येच ट्रेडर्स प्रमुख शेअरमध्ये खरेदी करताना दिसून आले.
 
मात्र, महागाई दरात वाढ झाल्यामुळे आणि औद्योगिक उत्पादनवाढीची आकडेवारी नकारात्मक आल्यामुळे नाेटाबंदीचा परिणाम पुढील महिन्यातही दिसणार आहे. यामुळे  सध्या तरी बाजार तांत्रिकदृष्ट्या 
कन्सोलिडेट होईल.  
 
सध्या तरी बाजारात जी वाढ दिसत आहे ती मजबूत कारणांवर आधारित नसून तात्पुरती वाढ आहे. वास्तविक एका छोट्याशा करेक्शननंतर बाजारातील वाढ जास्त तेजीत असते. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही खूपच चिंतेची बाब आहे.
 
तरीदेखील मोजक्या शेअरचा विचार केल्यास जास्त कालावधीसाठी बाजारातील आकर्षण कायम आहे. तरीदेखील अलीकडच्या काळात सावध राहण्याची आवश्यकता आहे. आर्थिक आकडेवारी तसेच राजकीय वातावरण बाजारातील धारणेवर परिणाम करण्याची शक्यता आहे. 
 
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची आकडेवारी अकरा मार्च रोजी घोषित होणार आहे. या निकालाचा बाजारावर अनपेक्षित परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यपणे बाजारात चांगली बातमी येण्याआधीच त्याचा परिणाम दिसायला लागतो.
 
यामध्ये मी निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करत नाही. फक्त अंदाजावर नाही, तर योग्य आकडेवारीच्या आधारावर खरेदी-विक्री करायला हवी. जागतिक पातळीवरील बाजारावर ट्रम्प यांचा प्रभाव कायम आहे. 
 
आर्थिक निर्देशांकांच्या आकडेवारीत सुधारणा झाल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारात तेजी कायम आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये १.५ टक्क्याची वाढ नोंदवण्यात आल्यामुळे तसेच अमेरिकेतील टाॅप किरकोळ विक्रेत्यांना अपेक्षेपेक्षा चांगला नफा झाल्यामुळे शेअर बाजाराने नवी विक्रमी पातळी गाठली आहे. कंपन्यांना होत असलेले चांगले उत्पन्न,
 
मजबूत आर्थिक डाटा आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात आर्थिक प्रोत्साहन मिळण्याच्या शक्यतेने वॉल स्ट्रीटमधील मुख्य निर्देशांक काही महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकी बाजार सकारात्मक धारणेसह वाढ मिळवत आहे. हीच धारणा पुढील काही कालावधीपर्यंतही कायम राहू शकते. 
 
यामुळे जगभरातील बाजारातही सकारात्मक धारणा कायम आहे. पुढील काळात राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी आणि मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीच्याही वर जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्याची परिस्थिती यांना विक्रमी पातळीवर पोहोचवतील.
 
मात्र, बाजार वाढ मिळवण्याचा प्रयत्न करत असताना गुंतवणूकदारांनी सावध राहणेही आवश्यक आहे. मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी २८.६५ अंकांच्या वाढीसह ८९०७.८५ या पातळीवर बंद झाला.
 
तांत्रिकदृष्ट्या याला पहिला रेझिस्टन्स ८९७३ च्या जवळपास मिळेल. सामान्य परिस्थितीत या पातळीवर बाजार कायम राहण्याची शक्यता आहे. निफ्टीने ही पातळी पार केली तर याला पुढचा रेझिस्टन्स ९०४९ या पातळीच्या जवळपास मिळेल. हा एक मजबूत रेझिस्टन्स सिद्ध होण्याची शक्यता आहे. 
 
घसरणीत निफ्टीला पहिला अाधार ८८०८ या पातळीवर जवळपास मिळेल. हा एक मजबूत आधार असेल. बाजार या पातळीच्या खाली गेल्यास बाजारातील धारणा नकारात्मक झाली असल्याचे मानावे.
 
अशा परिस्थितीत निफ्टीला ८७११ च्या जवळपास चांगला आधार मिळेल. 
शेअरमध्ये या आठवड्यात आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी चांगल्या स्थितीत आहे. आयसीआयसीआय बँकेचा सध्याचा बंद भाव २८४.८० रुपये असून यात २९१ रुपयांपर्यंत वाढ मिळण्याची शक्यता आहे. घसरणीत २७८ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा. एचडीएफसीचा सध्याचा बंद भाव १,४१२.४५ रुपये असून तो १,४३४ रुपयांपर्यंतची वाढ मिळवू शकतो, १,३९१ रुपयांवर स्टाॅपलॉस लावावा.
 
- लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. 
vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...