Home »Business »Business Special» News About IPhone-8 '

15 फूट दुरूनच चार्ज होईल: ‘आयफोन-8’, या वर्षी अॅपल बाजारात तीन आयफोन आणणार

वृत्तसंस्था | Feb 11, 2017, 03:53 AM IST

कॅलिफोर्निया -आयफोनला दहा वर्षे पूर्ण होत असून या वर्षी अॅपल बाजारात तीन आयफोन आणणार आहे. यातील एक तर आयफोन -८ (किंवा आयफोन एक्स) असेल, उर्वरित दोन आयफोन - ७ एसचे व्हर्जन असतील. गेल्या वर्षी आयफोन - ७ आणि ७ - प्लस बाजारात दाखल झाले. नवीन फोनमधील काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. अॅपलचे “सर्वात चांगले विश्लेषक’ म्हणून ओळख असलेले केजीआय सिक्युरिटीजचे मिंग-ची कुओ यांनी ही माहिती दिली आहे.
अलीकडे अॅपलच्या वतीने बाजारात दाखल करण्यात आलेल्या फोनमध्ये न दिसलेला “वॉव फॅक्टर’ या नव्या फोनमध्ये पुन्हा एकदा दिसेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सलग आलेल्या तीन फोनचा बाहेरील डिझाइन एकसारखाच होता. पहिल्यांदाच आयफोनची किंमत अमेरिकेत १,००० डॉलरपेक्षा जास्त असेल. किंमत वाढवण्यात आली असली तरी लोक या फोनची खरेदी करतील, असा कंपनीला विश्वास वाटत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी आलेला मॅकबुक प्रो याचे ताजे उदाहरण आहे.

वायरलेस चार्जिंगसाठी या फोनमध्ये विशिष्ट प्रकारचे कंपोनेंट असेल. यामुळे फोन जास्त गरम होईल. नव्या फोनचे पूर्ण आवरण (बॉडी) काचेची असेल. मेटल (अॅल्युमिनियम) बॉडीमध्ये फोनच्या आतील उष्णता गतीने बाहेर पडते. काचेच्या बॉडीमध्ये असे होणार नाही. स्क्रीनच्या खाली थ्री-डी टच सेन्सरला या उष्णतेपासून वाचवण्यासाठी नवीन ग्राफाइट लेयर असेल. यामुळेच या फोनची किंमत वाढणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, या वैशिष्ट्यामुळे वाढेल किंमत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended