आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराफींचा संप मिटला, 19 दिवसांनी आज व्यवहार, जेटलींच्या आश्वासनानंतर माघार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पात सोने, हिरे तथा अन्य किमती रत्नजडीत चांदीच्या आभूषणांवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्याच्या विरोधात २ मार्चपासून सुरू असलेला सराफांचा संप शनिवारी १८ व्या दिवशी मिटला. उलाढालीसाठी सराफांनी केलेले स्वयंमूल्यमापन ग्राह्य धरण्याचे आश्वासन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्यानंतर संप मिटल्याचे सूत्रांनी सांगितले. २ लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यालाही सराफांचा विरोध आहे. इन्सपेक्टर राज असणार नाही, असे आश्वासन जेटलींनी दिले. यासंदर्भात अधिसूचनेची प्रतीक्षा आहे, जीजेएफचे अध्यक्ष श्रीधर जीवी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...