आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील आठ वर्षांत मिळेल 90 लाख जणांंना रोजगार, जॉबच्या वाढत आहेत संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात वर्तमानात हवाबंद डब्यातील अन्नाची मागणी वाढत आहे. यासह अन्न प्रक्रिया उद्योगात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणूकही वाढत आहे. अशात हे क्षेत्र नोकरीसाठी एक चांगला पर्याय होऊ शकते. असोचेमच्या अहवालानुसार, २०२४ च्या शेवटापर्यंत साधारणत: ९० लाख लोकांना रोजगार मिळेल.  

जगात अमेरिकेनंतर सर्वाधिक उपजाऊ जमिनीबाबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. यासह देशात दूध, डाळ, ऊस आणि चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. गहू, तांदूळ, फळ आणि भाज्यांचे उत्पादन करण्यात अमेरिकेनंतर भारत दुसरा सर्वात मोठा देश आहे. एका अहवालानुसार, फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये (अन्न प्रक्रिया उद्योग)  २०२४ च्या शेवटापर्यंत जवळपास ३३ अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. फूड आणि रिटेल दोन्ही क्षेत्रांचा बाजार एकूण मिळून २०२० पर्यंत ४८२ दशलक्ष डॉलर होण्याची शक्यता आहे, जो २०१५ मध्ये २५८ दशलक्ष डॉलरचा होता. गेल्या काही वर्षांत देशाच्या एकूण निर्यातीत फूड प्रोसेसिंगचा १२ टक्के वाटा राहिलेला आहे. २०११ पासून २०१५ च्या दरम्यान प्रोसेस्ड फूडशी संबंधित उत्पादनांची निर्यात २३.३ टक्के वार्षिक दराने वाढली आहे. 

या उद्योगाच्या विस्ताराने लोकांसाठी नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. पॅकेज्ड फूडची मागणी वाढल्याने या क्षेत्रात सातत्याने अनेक प्रयोग केले जात आहेत, जेणेकरून यास अधिकाहून अधिक उत्तम बनविले जाऊ शकेल. अशात फूड टेक्नॉलॉजिस्ट, बायोकेमिस्ट, अॅनालिटिकल केमिस्टबरोबरच मॅनेजिंग आणि प्रशासकीय क्षेत्रात युवकांसाठी संधी वाढल्या आहेत. फूड टेक्नॉलॉजिस्ट अन्नाचे संरक्षण करण्यापासून यात उपयोगात येणारे कच्चे मटेरियलही लक्षात ठेवावे लागते. या प्रकारे बायोकेमिस्टचे काम अन्नाशी संबंधित बनावट, फ्लेवर आणि स्टोअरेजची गुणवत्ता वाढविण्यासाठी निर्देश देणे, अॅनालिटिकल केमिस्टचे काम फूड क्वालिटी राखणे, मॅनेजरचे काम प्रशासनाशी संबंधित कामांचे व्यवस्थापन करणे, तर अकाउंटट फायनान्सशी संबंधित काम करतात. याशिवाय या क्षेत्रात ऑर्गेनिक केमिस्ट, होम इकॉनॉमिक केमिस्ट, रिसर्च सायंटिस्टसारखी अन्य पदेही असतात. 
 
बातम्या आणखी आहेत...