आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता 300 हून कमी कामगार असलेल्या कंपन्या विनापरवानगी बंद करता येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर कामगार कायद्यात मोठे बदल करण्यात आले. ३०० पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्या सरकारच्या विनापरवानगी बंद करण्याची मुभा हा सर्वात मोठा बदल होता. राज्य सरकारही या नियमाची अंमलबजावणी करणार आहे. यासंदर्भात कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत २२ नोव्हेंबरला बैठक होणार आहे. 


कामगार विभागातील अधिकाऱ्यानुसार, केंद्र सरकार कायद्यात बदल करत असल्याने राज्यालाही बदल करावा लागत आहे. ३०० हून कमी कर्मचारी असलेल्या कंपन्या बंद करण्याची परवानगी मिळणार असली तरी कामगारांना जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल याची काळजीही घेण्यात येत आहे. 

 

कामगारांचे हित जपणार
कामगार उपायुक्त विलास बुवा म्हणाले, औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ मध्ये बदल प्रस्तावित आहे. कंपनी बंद झाल्याने त्यातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल यावर चर्चेसाठी २२ नोव्हेंबरला बैठक होत आहे. 

 

> विद्युत शक्ती न वापरणाऱ्या आस्थापनांमधील २० वा त्यापेक्षा जास्त कामगारांची संख्या ४० वर नेण्यात येणार आहे. याशिवाय तसेच इतरही अनेक हिताचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

 

काय आहे जुना नियम आणि त्यातील प्रस्तावित बदल

१. औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ अंतर्गत १०० पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्या मालकांना सरकारची परवानगी न घेता बंद करण्याचे अधिकार होते.
बदल : नव्या बदलानुसार आता १०० कर्मचाऱ्यांची संख्या ३०० वर नेण्यात आली आहे.
२. पूर्वीच्या नियमात कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांचा पगार देणे बंधनकारक होते. 
बदल : आता ६० दिवसांचा पगार देणे बंधनकारक करण्यात येईल. 

३. कंत्राटी कामगार कायदा हा पूर्वी २० वा त्यापेक्षा जास्त कंत्राटी कामगार असलेल्यांना लागू होता. 
बदल : आता ५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार असलेल्यांना हा कायदा लागू केला जाणार आहे. 
४. व्यवस्थापनाशी वाटाघाटी करण्यास मान्यताप्राप्त कामगार संघटनेची १५% सभासद संख्या होती.
बदल : कामगार संघटनेची सभासद संख्या आता वाढवून ३०% वर जाणार आहे.

५. विद्युत शक्ती वापरणारे १० व त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या उद्योगांंच्या कायद्यात बदल केला जाईल.  
बदल : अशा कामगारांची संख्या वाढवून आता ती २० कामगारांवर  नेली जाणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...