आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयसह तीन बँकांनी कर्ज केले स्वस्त; लाभ फक्त नव्या कर्जावरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) कर्जाचा व्याजदर ०.९०%, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ०.७०% तर युिनयन बँकेने ०.६५% कमी केला आहे. एसबीआयच्या एक वर्षाच्या कर्जावरील व्याजदर (एमसीएलआर) ८% झाला आहे. दोन व तीन वर्षांच्या मुदतीच्या कर्जावर हा दर ८.१०% आणि ८.१५% होईल. एसबीआयचे कुणी २० वर्षांसाठी २० लाख रुपये गृहकर्ज घेतलेले असेल तर महिन्याला ११४७ रुपये वाचतील. पीएनबीने एक वर्षासाठी एमसीएलआर ८.४५% केला आहे. ३ व ५ वर्षांसाठी व्याजदर अनुक्रमे ८.६०% आणि ८.७५% करण्यात आले आहेत. युनियन बँकेने १ वर्षाचा एमसीएलआर ८.६५% केला असला तरी त्याचा लाभ गृहकर्जावर होईल. कारण एमसीएलआरचा वर्षाला आढावा घेतला जातो.

समजा २० वर्षांसाठी तुम्ही २० लाखांचे गृहकर्ज काढलेले असेल तर त्याचा सध्याचा हप्ता ९.१५ व्याजदराने १८,१८८ रुपये आहे. नवा हप्ता (८.२५%) १७,०४१ रुपये असेल. यात १,१४७ रुपयांची बचत होईल. ऑटो लोन ५ वर्षांसाठी ५ लाखांचे असेल तर सध्या ९.६५% व्याजदराने हप्ता १०,५३८ रुपये आहे. तो नव्या ८.२५ % व्याजदराने १०,३१९ पडेल. ही बचत २१९ रुपये होईल. 

- एटीएममधून पाचपेक्षा अधिक वेळा पैसे काढले तर लागेल फीस : एकीकडे बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा अजूनही कायम असून दुसरीकडे एटीएमच्या ठरावीक वेळा वापरासाठी असलेली सूट काढून घेण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ३० डिसेंबरपर्यंत एटीएमचे शुल्क घेण्यास मनाई केली होती. आता ही फीस पुन्हा लागू करण्यात आली आहे.
 
- ज्या बँकेचे कार्ड आहे त्या बँकेच्या एटीएमवर पाच वेळा मोफत पैसे काढता येतील. यात बॅलेन्स इन्क्वायरीसारख्या वापराचा समावेश आहे.
असा असेल दर : { १ हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर मर्चंट डिस्काउंट रेटनुसार ०.२५% (२.५ रु.) तर २ हजार रुपयांवर ०.५०% (१० रु.) दराने फीस लागेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएमवरून पैसे काढताना ३ ट्रान्झेक्शननंतर प्रति ट्रान्झेक्शनवर २० रुपये, त्यावर सर्व्हिस टॅक्स पण आकारला जाईल. 
- नोटबंदीपूर्वी २ हजार रुपयांपर्यंत ०.७५%, यापेक्षा अधिक रकमेवर १% एमडीआर निश्चित होता.
- रेल्वे स्टेशनवरील हमालांना पीएफसाठी रेल्वे तिकिटावर १० पैसे सेस आकारला जाईल. यातून सरकारला वर्षाकाठी ४.३८ कोटी मिळतील. यातून देशातील २० हजार हमालांना पीएफ दिला जाईल.
- आधार कार्डने एनपीएस खाते उघडणे होणार सोपे : एनपीएस खात्यांसाठी आधार कार्ड क्रमांक आणि ई-सिग्नेचर पुरेसे असेल. मात्र, ई-सिग्नेचरसाठी आता ५ रुपये शुल्क व सेवा कर आणि सेसही द्यावा लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...