आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 पर्यंत 10 लाख सीएंची गरज, लहान शहरातही वाढली चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षात सीए अंतिम टप्प्यामध्ये समाविष्ट होणारे विद्यार्थी यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तथापि यात मोठ्या मुश्किलीने १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतात. देशात कॉर्पोरेट क्षेत्राच्या विस्ताराने   चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. अशात हे विद्यार्थ्यांसाठी करिअरचा चांगला पर्याय होऊ शकतो. देशभरात वर्तमानात केवळ २ लाख ५० हजार चार्टर्ड अकाउंटंटच उपलब्ध आहेत. 

गेल्या काही वर्षात देशातील कॉर्पोरेट क्षेत्रात वेगवान विकास पाहायला मिळतो आहे. लहान शहरात व्यवसायाचा वेगाने विस्तार झाला आहे. देशभरात आर्थिक उपक्रम वाढल्याने चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अनुसार देशभरात जवळपास २ लाख ५० हजार चार्टर्ड अकाउंटंट आहेत. २०२० च्या शेवटीपर्यंत देशात १० लाख व्यावसायिकांची गरज असेल. सध्या आकड्यांच्यानुसार दरवर्षी  जवळपास ७ हजार विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करतात. पण चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांची गरज पाहता ही संख्या खूपच कमी आहे. 

एका अहवालानुसार सीए अंतिम टप्प्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मे, २०१३ मध्ये २७ हजार ५५६ विद्यार्थी दोन्ही ग्रुपच्या परीक्षेत सहभागी झाले होते, तथापि मे, २०१६ मध्ये ही संख्या वाढून जवळपास ४० हजार १८० झाली आहे. म्हणजे तीन वर्षांत सीए अंतिममध्ये सहभागी होणारे विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास ५० टक्के वाढ झाली आहे. पण सीए उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपासच असते. तेच सीए कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या परीक्षा सीपीटी त उत्तीर्णांची टक्केवारी वाढली आहे.  जून, २०१३ मध्ये जवळपास २७ टक्के विद्यार्थ्यांनी सीपीटी परीक्षा उत्तीर्ण केली होती. तेच जून, २०१६ मध्ये ही संख्या वाढून जवळपास ३८. ९८ टक्के झाली. विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील वाढती आवड रुची आणि लहान शहरातील कॉर्पोरेट क्षेत्राचा विकास आणि व्यावसायिकांच्या वाढत्या मागणीच्या कारणाने हा करिअरचा उत्तम पर्याय असू शकतो. 

तीन विविध स्तरावर असतो अभ्यासक्रम 
सीए करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन विविध स्तर उत्तीर्ण करावे लागतात. पहिली सीपीटी म्हणजे कॉमन प्रोफिशिअन्सी टेस्ट असते. बारावीनंतर विद्यार्थी या प्रवेश चाचणीला उत्तीर्ण करून फाउंडेशन कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो. फाउंडेशन कोर्समध्ये विद्यार्थ्यांना ९ महिने वर्ग अटेंड करावे लागतात. फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर दुसऱ्या स्तरावर आयपीसीसीमध्ये प्रवेश मिळतो. यात विद्यार्थ्यांना कमीत कमी ११ महिन्यांचा वर्ग अटेंड करावा लागतो. यात दोन ग्रुप असतात. पुढील टप्प्यावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही ग्रुप क्लिअर (उत्तीर्ण) करावे लागतात. यानंतरच विद्यार्थ्यांना अंतिम भागात टप्प्यात प्रवेश मिळतो. हा तीन वर्षांचा आर्टिकलशिप अभ्यासक्रम असतो, ज्यास इंटर्नशिपदेखील म्हटले जाते. हे कोण्या सीएच्या अंडर मार्गदर्शनाखालीच पूर्ण केले जाते. 

अभ्यासक्रमात-सिलॅबसमध्ये होऊ शकतात बदल 
कॉमन प्रोफिशिअन्सी चाचणीत आता बहुविकल्पीय प्रश्नांसह व्याख्यात्मक प्रश्नही समाविष्ट केले जाऊ शकतात. फाउंडेशन कोर्स मध्ये दोन नवे विषय बिझनेस कॉरस्पॉन्डन्स अॅण्ड रिपोर्टींग आणि बिझनेस अॅण्ड कमर्शिअल नॉलेज समाविष्ट केले जातील. याप्रमाणे आयपीसीसी स्तरावर इकॉनॉमिक्स फॉर फायनान्स विषयाला समाविष्ट केले जाऊ शकते. याशिवाय अंतिम परीक्षेतही विद्यार्थ्याला आणि काही अन्य पर्याय उपलब्ध केले  जाऊ शकतात. 

यात रिस्क मॅनेजमेंडट, इंटरनॅशनल टॅक्सेशन, फायनांन्शियल सर्व्हिसेस अॅण्ड कॅपिटल मार्केट्स, ग्लोबल फायनांन्शियल रिपोर्टींग स्टॅण्डर्ड, इकॉनॉमिक्स लॉ अॅण्ड मल्टी डिसिप्लीनरी केस समाविष्ट आहे. या बदलाला यावर्षीपासून लागू केले जाण्याची शक्यता आहे. 

सर्व क्षेत्रात नाेकऱ्यांच्या संधी आणि शक्यताही 
लहान वा मोठ्या सर्वच कंपन्यांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांची आवश्यकता असते. बंॅकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राशिवाय आयटी, टेलिकॉम, रिटेल, रिस्क अॅण्ड अश्योरन्स सर्व्हिसेस, इव्हेंट मॅनेजमेंट, बिझनेस कन्सल्टन्सीसारख्या क्षेत्रातही यांच्यासाठी नाेकरीच्या संधी आहेत. 

७ -८ लाख रुपये वार्षिक पॅकेज 
सीए व्यावसायिकांचे वेतन पॅकेज प्रारंभीच सरासरीहून अधिक असते. आयसीएआयद्वारा आयोजित प्लेसमेेंटमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ७ ते ८ लाख रुपयांचे पॅकेज मिळते आहे. तेच आपली फर्म सुरू करणाऱ्या व्यावसायिकांची प्रारंभी उत्पन्न कमी असू शकते, पण काही वर्षाच्या अनुभवानंतर उत्पन्न अधिक होण्याची शक्यता असते.  
 
 
बातम्या आणखी आहेत...