आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फूड बिलवर सर्व्हीस चार्ज घेणे चुकीचे, सरकार जारी करणार दिशानिर्देश: पासवान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हॉटेलमध्ये जेवण-नाष्ट्याच्या बिलात चुकीच्या पद्धतीने सेवा शुल्क आकारणाऱ्यांविरुद्ध केंद्र सरकार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सूचना काढू शकते. ग्राहकविषयक मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
 
पासवान म्हणाले, हॉटेल-रेस्तराँच्या बिलात सेवा शुल्क चुकीच्या पद्धतीने वसूल केले जात आहे. याबाबतची सूचना मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. मंत्रालयातील एक अधिकारी म्हणाला, ग्राहकाला सेवा शुल्क भरण्यासाठी बळजबरी केली जाऊ नये. वाटल्यास ते वेटरला टीप देऊ शकतात किंवा बिलात सेवा शुल्क जोडण्यास संमती देऊ शकतात. ग्राहकाच्या संमतीशिवाय सेवा शुल्क वसूल करणे ग्राहक संरक्षण अधिनियमाअंतर्गत अनुचित व्यापार आहे.

बाटलीबंद पाणी पेप्सी संपूर्ण देशात एकाच एमआरपीत...
अन्न मंत्रालय पॅकेटबंद खाद्यपदार्थ आणि पेय समान एमआरपीवर विकण्यावर भर देत असल्याचे पासवान म्हणाले. दोन एमआरपी बेकायदा आहेत. पेप्सी अॅक्वाफिना हे बाटलीबंद पाणी देशभर एकाच एमआरपीत विकणार आहे, असे पासवान म्हणाले.

काय सांगतो ग्राहक संरक्षण कायदा?  
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार जर एखाद्या ग्राहकाकडून चुकीच्या पद्धतीने सर्व्हीससाठी पैसा घेण्यात येत असेल तर त्याला ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते. 
- ग्राहक मंत्रालयाला सर्व्हीस चार्जबाबत अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. त्यात हॉटेल्स आणि रेस्तरॉ चुकीच्या पद्धतीने सर्व्हीस चार्ज वसूल करत असल्याचे म्हटले होते. 
- काही हॉटेल्स मध्ये 5 ते 20 टक्के सर्व्हीस चार्ज वसूल केला जातो. तक्रारींनुसार अनेक हॉटेल आणि रेस्तरॉमध्ये सर्व्हीस चांगली नसूनही हा चार्ज द्यावा लागतो. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...