आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतर जमा नोटांची मोजणी अद्याप सुरू : दास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
योकोहामा (जपान)  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. जमा झालेल्या नोटांची अजूनही मोजणी सुरू असून, ही मोजणी पूर्ण होण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अार्थिक प्रकरणांचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली. भारतीय रिझर्व्ह बँक एक-एक नोट तपासून मोजत असल्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) वार्षिक ५० व्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी ते जपानच्या दौऱ्यावर आहेत.  

येत्या काही महिन्यांत नोटा मोजण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेकडे सामान्य स्थितीत नोटांची मोजणी करण्याची यंत्रणा असून, नोटाबंदीनंतर चलनातील ८६ टक्के नोटा मोजण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या जुन्या नोटा मोजण्याचे काम खूप मोठे असून रिझर्व्ह बँक एक-एक नोट मोजत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...