आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांशी वन-टाइम सेटलमेंट करण्याची मल्ल्याची इच्छा, पळपुट्या विजय मल्ल्याचे ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पळपुटा उद्योजक विजय मल्ल्याने बँकांशी वन टाइम सेटलमेंट करण्याची इच्छा व्यक्त कली आहे. बँकांनी नेहमीच वन-टाइम सेटलमेंट करण्याचे धोरण अवलंबले आहे. शेकडो कर्जदारांनी या माध्यमातून आपली प्रकरणे मिटवली आहे. मात्र, आमच्या प्रकरणात वाद सोडवण्यास नकार का देण्यात आला ? असा प्रश्न मल्ल्याने ट्विटवर उपस्थित केला आहे. मल्ल्या आणि त्याची बंद पडलेली कंपनी किंगफिशर एअरलाइन्सवर १७ बँकांच्या समूहाची ९४०० कोटी रुपये थकबाकी आहे. गेल्या वर्षी दोन मार्च रोजी मल्ल्या भारत सोडून लंडनला गेला. त्यानंतर देशातील अनेक न्यायालयाने त्याला पळपुटा घोषित केले. त्याला इंग्लंडमधून परत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.  
 
मल्ल्याने गुरुवारी एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले की, “आम्ही सर्वोच्च न्यायालयासमाेर जो प्रस्ताव दिला होता, त्यावर विचार न  करताच रद्द  करण्यात आला. निष्पक्ष आधारावर वादात सेटलमेंट  करण्यासाठी चर्चा करण्यास मी तयार आहे.’ आणखी एक ट्विट करत  म्हटले की, “सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करत बँका आणि आमच्यामध्ये  चर्चा करण्याची संधी देईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी आम्ही तयार  आहोत.’
 
मल्ल्याने म्हटले, ‘मी न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले आहे. सरकार कोणत्याही नि:पक्ष सुनावणीशिवाय मला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्त्यांनी माझ्याविरोधात जे आरोप लावले आहेत ते सरकारचे माझ्याविरोधातील धोरण स्पष्ट करते.’  
 
या प्रकरणात संपत्तीची दिलेली माहिती खरी आहे किंवा नाही याची विचारणा गुरुवारीच सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आपल्या मुलांच्या खात्यावर चार कोटी डॉलर (सुमारे २६८ कोटी रु.) हस्तांतरित केले असल्याचा आरोप एसबीआयच्या नेतृत्वातील बँकांच्या समूहाने केला आहे.  
 
आर्थिक गुन्हेगारांसाठी इतर देशांशी करार  
मोठे आर्थिक गुन्हेगार देश सोडून विदेशात जाऊन राहू नये यासाठी केंद्र सरकार अनेक देशांसोबत सामंजस्य करार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.  यासंबंधी कायदा करण्याची गरज आहे की नाही याचीही चाचपणी सरकार करत असल्याचे ते म्हणाले. काही देश अशा व्यक्तीला परत पाठवण्यासाठी मदत करत असले तरी त्या कामी मोठा कालावधी जातो. सरकारने अशा आर्थिक गुन्हेगारांची ८,०४० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असल्याचेही जेटली यांनी सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...