आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोट्या-मध्यम शहरांसाठी विमानाचे तिकीट दर कमाल १,७७० रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- छोट्या आणि मध्यम शहरांना विमान सेवेशी जोडण्यासाठी सरकारने “क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी योजने’चा (आरसीएस) आराखडा जाहीर केला आहे. २०१ किलाेमीटर ते ८०० किलोमीटरपर्यंतच्या विमान सेवेसाठी ही योजना लागू होणार असल्याची माहिती उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी आराखडा जाहीर करताना दिली. एक विमान एका तासात सरासरी ५०० किलोमीटरचे अंतर पार करते, त्यासाठी ४७६ ते ५२५ किलोमीटरपर्यंतचे जास्तीत जास्त भाडे २,५०० रुपये ठेवण्याचा प्रस्ताव आहे. २०१ ते २२५ किमी पर्यंतसाठी जास्तीत जास्त भाडे १,७७० रुपये, तर ७७६ ते ८०० किमीचे भाडे ४,०७० रुपये असणार आहे. डोंगराळ प्रदेशात कमी अंतर जाण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे अशा ठिकाणी २०० किलोमीटरच्या कमीत कमी मर्यादेत सूट देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत ज्या छोट्या किंवा मध्यम शहरात जुन्या विमानतळांचा िवकास करण्यात आला आहे, त्या विमानतळावरून जास्तीत जास्त भाडे निश्चित करण्यात येणार आहे. कोणत्याही विमानातील ५० टक्के प्रवाशांनाच या योजनेचा फायदा देण्यात येणार आहे. विमानातील प्रवासी संख्येनुसार कमीत कमी ९, तर जास्तीत जास्त ४० प्रवाशांसाठी या योजनेचा फायदा मिळेल. उर्वरित प्रवाशांचे भाडे ठरवण्यासाठी विमान कंपन्याना सूट देण्यात आली आहे. या मार्गावर जास्तीत जास्त ८० प्रवासी बसू शकतील अशाच विमानांना परवनगी देण्यात येईल. ही योजना पुढील १० वर्षांसाठी असेल. यात सुरुवातीची तीन वर्षे केंद्र सरकार नुकसान भरपाई देणार आहे. एखाद्या मार्गावर प्रवाशांची संख्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास भरपाईची रक्कम कमी होईल. प्रत्येक मार्गावर एका आठवड्यात कमीत कमी तीन, तर जास्तीत जास्त सात वेळा विमान उड्डाण करता येईल.
- सरकारने जाहीर केला विभागीय कनेक्टिव्हिटी योजनेचा आराखडा
- ४७६ ते ५२५ किमीसाठी जास्तीत जास्त भाडे २,५०० रुपये
- ७७६ ते ८०० किमीसाठी जास्तीत जास्त भाडे ४,०७० रुपये
बातम्या आणखी आहेत...