आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपत्ती घाेषित करण्याच्या माेहिमेला चांगला प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अघाेषित संपत्ती जाहीर करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अल्टिमेटम िदल्यानंतर मुंबईतील प्राप्तिकर विभाग उद्याेगपती, व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांचे उत्पन्न जाहीर करण्यासाठी सक्रिय झाला अाहे. संपत्ती घाेषित करण्याच्या माेहिमेला चांगला प्रतिसाद मिळत अाहे.

ज्या व्यक्ती ३० सप्टेंबरपूर्वी अापल्याकडील अघाेषित उत्पन्नाचा खुलासा करतील त्यांच्याकडून ४५ टक्के कर अाणि दंडाची रक्कम यातील ७.५ टक्के निधी हा कृषी कल्याण उपकर म्हणून जमा करण्यात येणार अाहे. त्यामुळे प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तींकडून एकप्रकारे देशाचा विकास अाणि दुष्काळाशी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी माेलाची मदत हाेऊ शकेल, असे मत मुख्य प्राप्तिकर अायुक्त राकेश मिश्र यांनी व्यक्त केलेे. अघाेषित संपत्ती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने अाणलेल्या नव्या याेजनेची माहिती देण्यासाठी गाेरेगाव स्पाेर्ट््स क्लबमध्ये अायाेजित करण्यात अालेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये या याेजनेची घाेषणा केली हाेती; परंतु अघाेषित संपत्ती जाहीर करताना अजूनही उद्याेगपती, व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण अाहे; परंतु ३० सप्टेंबरअगाेदर अघाेषित उत्पन्न आणि संपत्ती जाहीर करणे फायदेशीर अाहे. या याेजनेंतर्गत जाहीर करण्यात अालेले उत्पन्न अाणि संपत्ती यांनी माहिती पूर्णत: गाेपनीय राहील, इतकेच नाही तर अन्य काेणत्याही प्राप्तिकर अधिकाऱ्याला ती सांगण्यात येणार नाही, याबद्दल मिश्र यांनी उपस्थितांना अाश्वासित केले; पण प्राप्तिकर खात्यामध्ये माहिती तंत्रज्ञान यंत्रणा सक्षम असल्यामुळे काेणाकडे किती अघाेषित संपत्ती किंवा उत्पन्न अाहे याची माहिती कळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

हिताची योजना
प्राप्तिकर सहअायुक्त अखिलेश यादव म्हणाले की, ३० सप्टेंबरनंतर अघाेषित संपत्ती अाढळली तर कडक कायदेशीर कारवाईला सामाेरे जावे लागेल. त्यामुळे एक जूनपासून सुरू झालेल्या या एेच्छिक उत्पन्न याेजनेचा लाभ घेणे व्यापाऱ्यांच्या िहताचे अाहे.
बातम्या आणखी आहेत...