आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात यंदा कडधान्यांचे उत्पादन वाढल्यास महागाई घटणार : दास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - किमान हमी भाव (एमएसपी) वाढवल्यामुळे देशातील डाळींची उपलब्धता वाढून अन्नधान्यातील महागाई कमी होण्यास मदत मिळेल, असे मत अर्थमंत्रालयाने व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना किमान हमी भाव वाढवून देण्यात आला आहे, त्यामुळे कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली असल्याचे मत अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी ट्विट वर केले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने कडधान्याच्या किमान हमीभावात वाढ करण्यात आली असून एमएसपीमध्ये ४२५ रुपये क्विंटलची वाढ देण्यात आली आहे. यामुळे देशातील कडधान्य पेरणी क्षेत्रात आणि पर्यायाने कडधान्याच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. कडधान्याचे उत्पादन वाढल्यास सरकारला देशातील अन्नधान्यातील महागाई दर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळेच सरकारच्या वतीने एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मे महिन्यात घाऊक दरावर आधारित महागाई दर वाढून ०.७९ टक्क्यांवर गेला आहे.

जिरे महिन्यात १३०० रु. महागले
वृत्तसंस्था - जिऱ्याच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी नोंदवण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यातच जिऱ्याच्या दरात १३३० रुपये प्रतिक्विंटलची वाढ दिसून आली. चीनमध्ये उच्च प्रतीच्या जिऱ्याची मागणी वाढल्यामुळेच भारतीय बाजारात जिऱ्याचे दर वाढले असल्याचे मत व्यापाऱ्यानी व्यक्त केले आहे.

सिरिया आणि तुर्कीमधील जिऱ्याच्या उत्पादनात घट झाली असून त्यामुळे चीनमध्ये भारतीय जिऱ्याला मागणी वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात भारतातून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या जिऱ्यात १८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीतच ४५ हजार टन जिऱ्याची निर्यात झाली असल्याची माहिती “ट्रेड डेडा’ने दिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत
भारतातून फक्त १६ हजार टन जिरे निर्यात झाले होते. वास्तविक २०१५-१६ दरम्यान जिरे निर्यातीत घट नोंदवण्यात आली होती. २०१५-१६ मध्ये ९ हजार टन जिऱ्याची निर्यात झाली होती, तर २०१४-१५ मध्ये १.५५ लाख टन जिऱ्याची निर्यात झाली होती.

जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान झालेल्या पावसामुळे जिऱ्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला होता, अशी माहिती कमोडिटीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया यांनी दिली. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या जिऱ्याची मागणी वाढून किमती वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान जिऱ्याचे दर २० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहाेचण्याची शक्यता आहे. सिरिया आणि तुर्कीमधून जिऱ्याची निर्यात कमी झाल्यामुळे भारत सर्वात मोठा जागतिक जिरा निर्यातदार बनला आहे.

भारतीय जिऱ्याला मागणी वाढली असून त्या तुलनेत उच्च दर्जाच्या जिऱ्याचा तुटवडा वाढला आहे. त्यामुळे जिऱ्याचे दर वाढले असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...