आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स : 51,000 कोटी रुपयांची ‘ब्लॉक ट्रेडिंग'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिलायन्स उद्योगाच्या शेअरमध्ये गुरुवारी सुमारे ५१,००० कोटी रुपयांची ब्लॉक ट्रेडिंग झाली. एकूण ३९.६ कोटी शेअरचा व्यवहार झाला. कंपनीच्या १२.२१ टक्के भागीदारीच्या बरोबरीत हे शेअर आहेत. ही ट्रेडिंग रिलायन्स समूहाच्या संचालक कंपन्यांच्या दरम्यानच झाली आहे. यामुळे कंपनीच्या संचालकांच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताच बदल झालेला नाही.  
मुंबई शेअर बाजारातील उपलब्ध ब्लॉक डील डाटानुसार आदिशेष एंटरप्रायझेस, त्रिलोकेश कमर्शियल, अभयप्रदा इंटरप्रायझेस आणि तरन एंटरप्रायझेसने हे शेअर देवर्षी कमर्शियल आणि तत्वम एंटरप्रायझेसला विक्री केले आहेत. हे शेअर १,२८४ रुपयांच्या सरासरी किमतीवर विक्री करण्यात आले आहेत. याप्रमाणे पूर्ण व्यवहार ५०,८५८.८४ कोटी रुपयांचा झाला आहे. यामुळे मुंबई शेअर बाजारात रिलायन्स उद्योगाचे शेअर ०.३५ टक्क्यांच्या घसरणीसह १,२८७.३५ रुपयांवर बंद झाले.  

रिलायन्स उद्योगाच्या वतीने दोन मार्च रोजीच १५ संचालक कंपन्या दुसऱ्या आठ संचालक कंपन्यांना ११८.९९ कोटी शेअर हस्तांतरित करणार असल्याची घोषणा केली होती. कंपनीच्या संचालक समूहामध्ये ६३ कंपन्या आणि व्यक्ती आहेत. 

या संचालक समूहामध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश, अनंत तसेच मुलगी ईशा यांचाही समावेश आहे. संचालक समूहाची एकूण भागीदारी ४५.२४ टक्के आहे. मुकेश अंबानींकडे ३६.१५ लाख, नीता यांच्याकडे ३३.९८ लाख, आकाश यांच्याकडे ३३.६३ लाख, अनंत यांच्याकडे एक लाख आणि ईशाकडे ३३.६३ लाख शेअर आहेत.
बातम्या आणखी आहेत...