आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी सहा कंपन्यांच्या विरोधातील सेबीच्या आदेशाला स्थगिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सेबीने प्रतिबंधात्मक श्रेणीमध्ये टाकलेल्या आणखी सहा कंपन्यांना  सिक्युरिटीज अपिलीय  लवादाने (सॅट) स्थगिती आदेश दिला आहे. यामध्ये पार्श्वनाथ डेव्हलपर्स, केव्हिट इंडस्ट्रीज, पिनकॉन स्पिरीट, सिग्नेट इंडस्ट्रीज, कल्पना इंडस्ट्रीज आणि एसक्यूएस इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे. 

तीन सदस्य असलेल्या लवादासमोर कंपन्यांनी तीन वर्षांची कागदपत्रे दाखवली आहेत. सेबीनेही हे मान्य केल्याने या कंपन्यांना प्रतिबंधित श्रेणीमध्ये टाकण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.  या कंपन्यांनी सेबीकडे अर्ज केला असून सेबीने चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.  
बातम्या आणखी आहेत...