आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाडेला वर्तवतील, तंत्रज्ञान बदलाचे भविष्य, ‘हिट रिफ्रेश’ पुस्तक पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला ‘हिट रिफ्रेश’ नावाने पुस्तक लिहीत आहेत. हे पुस्तक पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये बाजारात दाखल होणार आहे. या पुस्तकात नवी ऊर्जा, नवे विचार आणि नवीन संदर्भाच्या शोधात लोक, संघटना आणि समाज कसे बदलू शकतात आणि त्यांनी कसे बदलायला हवे, याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
सर्वसाधारणपणे कोणताही यशस्वी उद्योजक आपल्या यशामागचे गुण पुस्तकात लिहीत असताे. मात्र, नाडेला यांनी वेगळे पुस्तक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, “हे पुस्तक परिवर्तनासंदर्भात आहे. हे पुस्तक आयुष्यावर किंवा यश कसे मिळेल या विषयाचे नाही, तर मी हे पुस्तक मायक्रोसॉफ्टचे सदस्य, ग्राहक आणि भागीदारांसाठी लिहितो आहे. बदलाच्या या गोष्टी त्यांच्यासाठी उपयोगी ठरतील अशी मला आशा आहे. यातून ते स्वत:साठी नवीन मार्ग शोधतील’ भविष्यात तंत्रज्ञानाचा विकास तेजीने होणार असल्याचे त्यांनी लिहिले आहे. अशा परिस्थितीत “संवेदना’सारख्या गुणांना जास्त महत्त्व मिळेल. जास्त यश मिळवण्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संघटनेला समर्थ कसे करता येईल. या पुस्तकात त्यांनी स्वत:चे आणि मायक्रोसॉफ्टचे उद्दिष्ट सांगितले आहे.
जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी ४८ वर्षीय नाडेला यांच्यावर असली तरी त्यांना जेव्हा-जेव्हा वेळ मिळेल त्या वेळी ते ‘स्लेट’ आणि ‘फायनान्शियल टाइम्स’सारख्या वृत्तपत्रात लेख लिहीत असतात. पुस्तकाच्या स्वरूपात लिहिण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे. या पुस्तकाच्या िवक्रीचा अधिकार हार्पर बिझनेसकडे देण्यात आला आहे. हा हार्पर कॉलिन्सचाच एक भाग असून हार्पर बिझनेसने याआधीदेखील अनेक यशस्वी उद्योजक आणि संस्थांच्या पुस्तकांचे प्रकाशन केलेले आहे. या संदर्भात हार्पर बिझनेसचे अध्यक्ष आणि सीईओ ब्रायन मरे यांनी सांगितले की, या पुस्तकातून मायक्रोसॉफ्टमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती सर्वांसमोर येणार आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून जो पैसा जमा होणार आहे, तो पैसा नाडेला “मायक्रोसॉफ्ट फिलेन्थ्रॉपीज’ला दान करणार आहेत. कंपनीने गेल्या वर्षीच याची सुुरुवात केली होती. या पैशाचा वापर कंपनी “क्लाउड कॉम्प्युटिंग प्रोजेक्ट’ मध्ये करणार आहे.
सीईओ असताना गेट्स यांनी लिहिले पुस्तक
बिल गेट्स ज्या वेळी मायक्रोसॉफ्टचे सीईओ होते, त्या वेळी त्यांनी दोन पुस्तके लिहिली होती.‘द रोड अहेड’ या पुस्तकाचे प्रकाशन १९९५ मध्ये झाले होते, तर दुसरे ‘बिझनेस @ स्पीड ऑफ थॉट’ हे १९९९ मध्ये आले होते.
‘हिट रिफ्रेश’मध्ये प्रमुख तीन टप्पे
नाडेला यांनी ‘हिट रिफ्रेश’मध्ये तीन स्टोरी लाइन ठरवल्या आहेत. त्यात एक आपल्या जीवनातील बदलावर असून दुसरी जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीत कोणते बदल होत आहेत, तर तिसरे म्हणजे दिवसेंदिवस इंटेलिजेन्ट मशीनची क्षमता वाढत असताना भविष्यात तंत्रज्ञानाला कोणते रूप मिळेल याविषयी असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...