आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात समुद्राचे पाणी आणि सौरऊर्जेवर चालणार हरितगृह, १३३३ कोटींचा खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - समुद्राचे पाणी आणि सौरऊर्जेच्या मदतीने भाजीपाला पिकवू शकणारे जगातील पहिलेच हरितगृह ऑस्ट्रेलियातील पोर्ट ऑगस्टा सिटीच्या वाळवंटात तयार करण्यात आले आहे. समुद्राच्या पाण्याला सौरऊर्जेच्या विजेच्या माध्यमातून शेतीपयोगी बनवले जात आहे. हे हरितगृह ५० एकर परिसरात पसरले असून त्यासाठी १३३८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
याठिकाणी दरवर्षी १७ हजार टन भाजीपाला पिकवला जाऊ शकतो. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिलिप सॉमवेबर यांच्या मते, जीवाश्म इंधन, भूजल, कीटकनाशकांचा उपयोग करण्यात न आलेले हे जगातील अशा प्रकारचे पहिलेच कृषितंत्र आहे. यात संपूर्णत: जैविक फार्महाऊस आहे.
टोमॅटोचे उत्पादन सुरू
सध्या या हरितगृहात टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. यंदाच्या हंगामात याठिकाणी १७ हजार टनाचे उत्पन्न झाले असून याची ऑस्ट्रेलियाच्या बाजारात निर्यात केली जात आहे.

२ किमी अंतराहून पाइपलाइनद्वारे आणले समुद्राचे पाणी
ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर खाडीहून फार्महाऊसपर्यंत २ किलोमीटर लांब पाइपलाइनद्वारे समुद्राचे पाणी आणण्यात आले आहे. वाळवंटातील तीव्र तापमानापासून रोपट्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या बाजूला ओले कार्डबोर्ड ठेवले जाते. ही रोपटी मातीऐवजी नारळाच्या भुकटीत उगवली जातात.

कमी पाणी असलेल्या भागांसाठी उपयोगी
या प्रकल्पाची २०१० मध्ये सुरुवात झाली होती. ओमान, कतार आणि संयुक्त अरब अमिरातसारख्या कमी पाणी असणाऱ्या जागी अशा प्रकल्पांवर काम सुरू आहे, तर पोर्तुगाल आणि अमेरिकेतही अशी हरितगृहे बनवण्याची तयारी सुरू आहे.

३९ मेगावॅट वीजनिर्मिती
फार्महाऊसमध्ये २३ हजार सोलर प्लेट लावण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात एका दिवसात ३९ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याची रिसायकलिंग व हिवाळ्यात हरितगृहाला उष्ण ठेवण्यासाठी इतकी वीज पुरेसी आहे.
बातम्या आणखी आहेत...