आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना शेंद्र्यात स्वारस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्ली-मुंबईइंडस्ट्रियल काॅरिडाॅरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला अाहे. त्यामुळे अाैरंगाबाद शहराला चांगली मागणी असून बऱ्याच कंपन्या शेंद्रा-बिडकीन अाैद्याेगिक पट्ट्यात जागा बघत अाहेत. विशेषकरून वाहन अाणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या स्वारस्य दाखवत असून सप्टेंबरअखेरपर्यंत या कंपन्यांना जागा उपलब्ध हाेण्याची शक्यता अाहे.

शेंद्रा-बिडकीनच्या पहिल्या टप्प्यातील चार हजार हेक्टरची सर्व जागा ताब्यात अाली असून शेंद्र्यामध्ये ८४५ हेक्टर जागेवर विकासाची कामे झाली अाहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार उद््घाटनाची वाट बघता पहिल्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली अाहे. अाैरंगाबादमध्ये कंपन्या जागा शाेेधत असून सप्टेंबरअखेरपर्यंत जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ‘दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाॅर’चे महाव्यवस्थापक गजानन पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

रस्ते, सांडपाणी, अाैद्याेगिक पाण्यासाठी पाइप, मलनिस्सारण, पाण्याच्या पुनर्वापरासाठी पाइप, विजेच्या तारा टाकणे या कामांसाठी कंत्राटी निविदा काढण्यात अाल्या हाेत्या. या सर्व कामांना मार्च महिन्यापासूनच सुरुवात झाली असून डिझाइनचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले.

एक्झिबिशन सेंटर
एक्झिबिशनसेंटर अाणि कन्व्हेन्शन सेंटर नागपूरला हलवण्यात येणार असल्याची चर्चा अाहे. त्याबाबत विचारले असता पाटील यांनी अापले मत व्यक्त केले नाही. डीएमअायसी प्रकल्पात एक्झिबिशन सेंटर अाणि कन्व्हेन्शन सेंटरचा समावेश अगाेदरच असून प्रशासकीय इमारत हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

शेंद्र्यामध्ये प्रशासकीय इमारत
जालनाराेड शेंद्र्याच्या बाजूने जाेडण्यासाठी दाेन पूल उभारण्यात येत अाहेत तसेच शेंद्र्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असून त्यासाठी जुलैच्या पहिल्या अाठवड्यात निविदा निघण्याची शक्यता अाहे. परंतु सध्या रस्ते पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्याचे विस्तारीकरण
पैठणच्यारस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात अाले असून हा रस्ता िबडकीनला अगाेदरच जाेडण्यात अाला अाहे. या रस्त्याचे तातडीने विस्तारीकरण करण्यात येणार असून त्यासाठी वेगळा सल्लागार नेमला जाणार अाहे.

बिडकीनचे काम तीन टप्प्यांत : बिडकीनचेकाम तीन टप्प्यांत हाेेणार असून त्यामध्ये २००० ते २६०० एकर जमिनीचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जुलै ते अाॅगस्टमध्ये काढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...