आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. सत्पथींनी बनवली जगभरात शिर्डीच्या साईबाबांची 250 मंदिरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी  - डॉ. चंद्रभानू सत्पथी यांनी जगभरात शिर्डीच्या साईबाबांची २५० पेक्षा जास्त मंदिरे उभारली आहेत. त्यांच्या प्रयत्नातून अनेक कल्याणकारी संस्था काम करत आहेत. २७ वर्षांपासून डॉ. सत्पथी शिर्डी साईबाबांचे नाव तसेच उपदेशांचा प्रचार करत आहेत. साईबाबांनी दिलेल्या उपदेशांच्या अनुरूप शांतीच्या मूलभूत तत्त्वांवर, सर्वाप्रति आदर, करुणेच्या प्रसाराच्या दिशेने डॉ. सत्पथी यांच्या भूमिकेला मान्यता देत त्यांना अमेरिकेतील “हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या २४ जून २०१५ साठीच्या सत्रात “गेस्ट चॅपलिन’च्या स्वरूपात उद््घाटनासाठी “हाऊस चॅपलिन’ने आमंत्रित केले होते.
 
“हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या २२८ वर्षांच्या इतिहासात भारतीय नागरिकाचा हा विशिष्ट सन्मान होता. डाॅ. सत्पथी यांनी भाषणात “हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह’ला साईबाबा तसेच गीतेतील मूळ विचारधारेचा परिचय करून दिला. बाबांच्या उपदेशांचा प्रचार  ते पुस्तकांच्या माध्यमातून करत आहेत. इतर संतांवर ७० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. या पुस्तकांचा काश्मिरी, तामिळ, तेलुगू, पंजाबी, नेपाळी, गुजराती, बांगला, आसामी, मराठी, हिंदी अशा १० भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...