आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढवण्याचे संकेत, डिसेंबरमध्ये झाली होती वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असून आतापर्यंत जाहीर झालेल्या तिमाही आकडेवारीत सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील काळात अमेरिकी सेंट्रल बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहेत.

येथील जॅक्सन सभागृहात बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील मजबूत आकडेवारी तसेच अर्थव्यवस्थेतील हालचाली आणि महागाईविषयी आमच्या अंदाजानुसार आकडेवारी आली असून त्यामुळे येत्या काळात व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे मत जेनेट यांनी व्यक्त केले.
सप्टेंबरमध्ये व्याजदरात वाढ : फेडरल रिझर्व्हची पतधोरण आढावा बैठक २१ ते २२ सप्टेंबरदरम्यान होणार असून या बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो. असे असले तरी फेडच्या अध्यक्षांनी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नसून सप्टेंबरपर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली राहिल्यास या बैठकीत व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

बेरोजगार भत्त्यांची मागणी घटली : अमेरिकेतील बेरोजगारांची आकडेवारी १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. या आकडेवारीनुसार अमेरिकेत आॅगस्ट महिन्यात २.६१ लाख बेरोजगारांनी नोंदणी केली असून हा अाकडा अंदाजापेक्षा २.६५ लाखांनी कमी आहे. याव्यतिरिक्त ग्राहकोपयोगी वस्तूंमध्येदेखील ४.४ टक्के तेजी नोंदवण्यात आली.
डिसेंबरमध्ये झाली होती वाढ
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने डिसेंबर २०१५ मध्ये व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी सलग ९ वर्षांपर्यंत आर्थिक मंदी तसेच अर्थव्यवस्थेत असलेल्या अडचणींमुळे व्याजदरात कोणताच बदल करण्यात आलेला नव्हता. डिसेंबर २०१५ पासून फेडरल व्याजदरात वाढ करेल अशी भीती कायम आहे. अमेरिकेतील व्याजदरात वाढ झाल्यास त्याचा विपरीत परिणाम जगभरातील विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकी बाजारात तेजी
जेनेट येलेन यांच्या भाषणानंतर अमेरिकी शेअर बाजारात एक टक्क्यापेक्षा जास्तीची तेजी नोंदवण्यात आली आहे. फेडरल रिझर्व्हच्या वतीने या वर्षी व्याजदरात वाढ करण्यात येण्याची शक्यता कमी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फेडरल रिझर्व्हची पुढील बैठक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. आता या बैठकीकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
जेनेट येलेन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- न्यूट्रल दरांमुळे व्याजदर कमी करणे शक्य नाही.
- थोड्या-थोड्या अंतराने व्याजदरात वाढ करता येईल.
- फेड भविष्यात मालमत्ता खरेदी करू शकते.
- विदेशातील मागणी कमी होत आहे.
- फिस्कल धोरणामुळे अर्थव्यवस्थेत स्थिरता येईल.
- गेल्या काही कालावधीपासून परिस्थिती अनुकूल आहे.
- उत्पादकता वाढवण्यासाठी पर्याय शोधावा लागेल.
- व्यवसायामध्ये सलग गुंतवणूक वाढत आहे.
- अमेरिकेत महागाई दर उद्दिष्टाच्या जवळ आहे.
बातम्या आणखी आहेत...