आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पाइसजेट 205 विमाने घेणार विकत, प्रवासी संख्येत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
नवी दिल्ली - कमी भाडे ठेवून ग्राहकांना सेवा देणारी विमान वाहतूक कंपनी स्पाइसजेट १.५ लाख कोटी रुपये खर्च करून बाेइंगकडून २०५ विमाने खरेदी करणार आहे. भारतीय हवाई वाहतूक उद्योगातील हा सर्वात माेठ्या व्यवहारातील एक व्यवहार ठरणार आहे. स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंह तसेच बाेइंगचे उपाध्यक्ष रे कॉनर यांनी शुक्रवारी यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.  

स्पाइसजेटने ५५ विमानांची ऑर्डर आधीच दिली असून सुमारे ७५,००० कोटी रुपयांत १०० नवीन ७३७-८ मॅक्स विमान खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे.  याव्यतिरिक्त स्पाइसजेटला ५० आणखी व्हाइट बॉडी असणारी विमाने खरेदी करायची असल्याचे सिंह यांनी या वेळी  सांगितले. कंपनीच्या विमानांच्या ताफ्यात पुढील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपासून १५५ विमाने येण्यास सुरुवात होईल. २०२४ पर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. सध्या स्पाइसजेटकडे ३२ मोठी विमाने (नेक्स्ट जनरेशन बी ७३७ एस) तसेच १७ छोटी विमाने (बॉम्बर्डियर क्यू ४०० एस) आहेत. एक महिन्यापेक्षाही कमी कालावधीत विमान खरेदी करण्याची ही देशातील दुसरी घोषणा आहे. या आधी विमान वाहतूक कंपनी गो-एअरनही ५३,००० कोटी रुपयांत एअरबसकडून ७२ विमाने खरेदीची घोषणा केली आहे.
 
90 लाख लोक देशात दर महिन्याला देशांतर्गत वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करत आहेत.
 
81.7 टक्के स्पाइसजेटची उड्डाणे नोव्हेंबर महिन्यात नियोजित वेळेत झाली.
 
20 ते 25 टक्क्यांच्या गतीने दरवर्षी वाढतेय प्रवाशांची संख्या