बीड - दुष्काळानंतर पाऊसमान अाणि त्यानंतर मंदीचा सामना करणाऱ्या व्यापारपेठेला दिवाळीच्या काळात दिलासा मिळाला. परंतु नंतर नाेटबंदीमुळे दीड महिना व्यापार थंडच राहिला, तर विक्रीअभावी पडून राहिलेल्या डाळीचे भाव घसरल्याने व्यापाऱ्यांना माेठा फटका बसला अाहे. यंदा तुरीचे अालेले चांगले व उदंड पीक अाणि येणाऱ्या हरभऱ्याचे चांगले पीक लक्षात घेता किराणा बाजारात दोन्ही डाळींचे भाव आणखी कमी हाेण्याचे संकेत अाहेत. मागील वर्षी दीडशे रुपये किलोपर्यंत गेलेले डाळीचे दर यंदा चांगल्या पीक परिस्थितीमुळे कमालीचे घसरले. साखरेने कडवटपणा सुरूच ठेवला अाहे.
वधीत साखरेचे भाव ३६०० रुपये क्विंटल हाेते. मात्र दाेन महिन्यांत साखरेत उसाअभावी अाणि बफर स्टाॅक नियंत्रणाच्या अनुषंगाने क्विंटलमागे चारशे रुपयांनी तेजी अाली. तामिळनाडूच्या शेेडम भागात उत्पादन कमी झाल्याने ५० रुपयांवरून साबुदाणा दाेन महिन्यांत ८० रुपये किलोपर्यंत पाेहोचला.
गहू घसरला, ज्वारीत तेजी : दाेन महिन्यांपूर्वी नोव्हेंबरदरम्यान बाजारात गव्हाचे भाव २५०० रुपये क्विंटल हाेते. ते २८०० रुपयांपर्यंत तेजीत राहिले. फेब्रुवारी, मार्चदरम्यान येणारे नवे पीक लक्षात घेता भाव पुन्हा २५०० रुपयांपर्यंत स्थिरावले अाहेत. तर मागील दाेन आठवड्यांतील थंडीमुळे ज्वारीचे पीक बाधित झाले अाहे. किरकोळ बाजारात दर्जेदार ज्वारी ३५ रुपये किलोपर्यंत पोहोचली अाहे. गावरान बाजरीचे भावही तेवढेच ३५ रुपये अाहेत.
तेल डबा शंभराने महागला : मागील दाेन महिन्यांत खाद्यतेलात पंधरा लिटरमागे शंभर रुपयांनी तेजी अाली अाहे. अकराशे रुपयांना मिळणारा पंधरा लिटरचा डबा सध्या १२०० रुपयांना अाहे. इतर तेलांच्या दरातही साैम्य वाढ झाली अाहे.
शेंगदाणे घसरले
-मागील वर्षी दुष्काळामुळे राज्यात तसेच इतर राज्यांत कमी उत्पादनामुळे शेंगदाणे ११० रुपये किलोपर्यंत हाेते. दिवाळीत भाव शंभर रुपये किलाे हाेते. यंदा चांगल्या उत्पादनामुळे सध्या ठाेक भाव ७५ ते ८० रुपये किलोपर्यंत उतरले अाहेत.
- गाेपाल अग्रवाल, होलसेल किराणा
व्यापारी, बीड.
बाजार सावरतोय
-दिवाळीनंतर नाेटबंदीनंतर बाजार कमालीचा थंड हाेता. बाजार अाता सावरतोय. संक्रांत अाणि लग्नसराईमुळे सध्या ग्राहकी अाहे. या वेळी चांगले पीक अाल्यामुळे डाळीचे भाव कमी झाले अाहेत.
- गंगाबिशन करवा, होलसेल किराणा व्यापारी, बीड.
Ãमागील वर्षी दुष्काळामुळे राज्यात तसेच इतर राज्यांत कमी उत्पादनामुळे शेंगदाणे ११० रुपये किलोपर्यंत हाेते. दिवाळीत भाव शंभर रुपये किलाे हाेते. यंदा चांगल्या उत्पादनामुळे सध्या ठाेक भाव ७५ ते ८० रुपये किलोपर्यंत उतरले अाहेत.
- गाेपाल अग्रवाल, होलसेल किराणा
व्यापारी, बीड.