आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा सरासरी पगारवाढ 9.5%, गेल्या वर्षीपेक्षा 0.7% कमी, 2007मध्ये 15.1 % पगारवाढ, तेव्हापासून सलग घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय कंपन्या या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९.५ टक्क्यांची वाढ करतील. वर्ष २०१६ मध्ये सरासरी १०.२ टक्क्यांची पगारवाढ झाली होती. सरासरी पगारवाढीत घट झाली असली तरी आशिया-प्रशांत देशांमध्ये भारतात होत असलेली पगारवाढ सर्वाधिक आहे.
 
एचआर कन्सल्टन्सी संस्था एऑन हेव्हिटच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार दशकभरापासून दरवर्षी होणाऱ्या पगारवाढीत थोडी-थोडी घट नोंदवण्यात येत आहे. २००७ मध्ये लोकांचा पगार सरासरी १५.१ टक्क्यांनी वाढला होता.  
 
जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय घटनाक्रम पाहता पगारातील वाढीचा आकडा भारतीय कंपन्यांमधील परिपक्वता दाखवत असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. सर्वेक्षणात विविध क्षेत्रांतील १००० कंपन्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. राजकीय बदल आणि आर्थिक घटनाक्रमांमुळे व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे कंपन्यांनी सांगितले.  
 
चांगले काम करणारे २१ वर्षांत सर्वात कमी  : २०१६ मध्ये कंपन्यांमध्ये “हाय परफॉर्मर’ कर्मचाऱ्यांची संख्या केवळ ७.५ टक्के होती. हा आकडा गेल्या २१ वर्षांतील सर्वात कमी आहे.  
 
कौशल्य असणारे कर्मचारी वारंवार नोकरी बदलतात 
-जीवन विज्ञान, खासगी व्यावसायिक, रसायन, मनोरंजन, वाहन उद्योग आणि गृहोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात सर्वाधिक १० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढ होईल.
 
- नोकरी बदलणाऱ्यांचा दर १६.४ टक्के राहिला. हा आकडा २०१५ च्या बरोबरीत आणि विकसनशील देशांत सर्वात कमी आहे. मात्र, कौशल्य असणाऱ्या लोकांचे नोकरी बदलण्याचे प्रमाण ७.३ टक्क्यांनी वाढून १२.३ टक्के झाले आहे.
 
“टॉप परफॉर्मर’चा पगार सरासरी १.८ पट जास्त 
 परफॉर्मन्स आणि कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित झाल्यामुळे पगारातील अंतर वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत टॉप परफॉर्मरचा पगार १.८ पट वाढला आहे.  
बातम्या आणखी आहेत...