आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीला गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहकांचा ४० टक्के जास्त खर्च ; गॅजेट्सची मागणी जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्याच्या सणासुदीच्या दिवसात ग्राहकांच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. उद्योग तसेच वाणिज्य संघटना असोचेमच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अहवालानुसार अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच इतर अनेक कारणांमुळे जसे की, व्याजदरात कपात यामुळे चालू सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या वतीने मागणीत वाढ होईल. ग्रामीण भागतील मागणीवर देखील सणांचा रंग वाढत असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. मान्सून चांगला बरसल्याने शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील कामगारांमध्ये विश्वास वाढला आहे. देशातील ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात दुचाकी आणि दागिने तसेच टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तंूची मागणी वाढत आहे. सणासुदीला ग्रामीण भागातील मागणीत वाढ हाेत असून चांगल्या मान्सूनमुळे शेतकरी आणि शेतीतील कामगारांमध्ये विश्वास वाढला असल्याचे मत असोचेमने व्यक्त केले आहे. असे असले तरी रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी नीचांकी पातळीवर कायम आहे. हे सर्वेक्षण दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, चंदिगड, लखनऊ आणि इंदूर शहरामध्ये करण्यात आले होते. हे सर्व्हेक्षण विविध वयोगटातील जसे, २२ ते ३४ वर्षे आणि ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील ग्राहकांमध्ये करण्यात आले.

स्वस्त कपड्यांची मागणी
अहवालानुसार पुढील तीन महिन्यांत सर्वात जास्त मागणी स्वस्त कपड्यांची असेल. यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गॅजेट्स, किराणा, फॅशनसंबंधित सामानाची मागणी वाढेल

मोबाइलवर दुप्पट खर्च
या वेळी ग्राहक सर्वात जास्त खर्च मोबाइल फोन किंवा इतर गॅजेट्सवर करतील असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मोबाइलवर या वेळी त्यांचे बजेट सहा महिने आधीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त होईल.

या वस्तूंची मागणी
कार, दुचाकी वाहने, मोबाइल हँडसेट, लॅपटॉप, इतर इलेक्ट्रॉनिक आयटम, टिकाऊ ग्राहकी सामान. फॅशनेबल कपड्यांच्या मागणीत ३०% पेक्षा जास्त वाढ.

मोबाइलवर दुप्पट खर्च
या वेळी ग्राहक सर्वात जास्त खर्च मोबाइल फोन किंवा इतर गॅजेट्सवर करतील असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मोबाइलवर या वेळी त्यांचे बजेट सहा महिने आधीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त होईल.

मध्यमवर्गीयांचे बजेट वाढले
मध्यमवर्गीय सणासुदीच्या काळात जास्त खर्च करत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. सणासुदीदरम्यान एक मध्यमवर्गीय कुटुंब घरातील सामानावर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सरासरी १०,००० ते २५,००० रुपये खर्च करते. सर्वात जास्त खर्च मोबाइल, लॅपटॉप आणि एलईडी टीव्हीवर होतो.

पूर्व-पश्चिममध्ये ग्राहकांची मागणी जास्त, उत्तरेतही वाढ
सध्या ग्राहकांच्या मागणीत सर्वात जास्त वाढ पूर्व आणि पश्चिमी क्षेत्रात नोंदवण्यात आली आहे. कोलकाता आणि पूर्वेकडील इतर शहरात दुर्गापूजेदरम्यान खरेदी वाढली, तर पश्चिम क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रीदरम्यान मागणीत वाढ झाली असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले. दिवाळीपर्यंत उत्तरी क्षेत्रातील दिल्ली आणि इतर शहरांमध्ये मागणी वाढू शकते.
बातम्या आणखी आहेत...