आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विज्ञान-तंत्रज्ञानात ८१ % महिलांशी भेदभाव, ग्लोबल वर्कफोर्स संस्थेच्या अहवालातील निष्कर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताशी संबंधित नोकरी करत असलेल्या महिला भेदभावाच्या सर्वाधिक शिकार बनतात, असा दावा केली ग्लोबल वर्कफोर्स या संस्थेने एक अहवालात केला आहे. या क्षेत्रातील ८१ टक्के महिलांच्या मते, कामाचे आकलन करताना त्यांना निशाणा बनवले जाते.

या भेदभावामुळे बहुतांश महिला मध्येच नोकरी सोडण्यास बाध्य होतात. शिवाय मुलांचे पालनपोषण हेसुद्धा महिलांचे नोकरी सोडण्यामागील एक मोठे कारण आहे. अहवालानुसार, भारतातील विवाहित महिलांना दुहेरी जबाबदारीतून जावे लागते. त्यांना काम आणि परिवारादरम्यान संतुलन ठेवावे लागते. घरकाम सांभाळणे महिलांचीच जबाबदारी असल्याचे स्त्री आणि पुरुष दोघांचेही मत आहे. स्टेममध्ये ४६ टक्के पदवीधारक महिला असतात. मात्र, त्या या क्षेत्रात करिअर करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यताही कमीच राहते. २०१५ मध्ये १२ टक्के कंपन्यांच्या कार्यकारिणीत किमान एका महिला सदस्याच्या नियुक्तीचे नियम अयशस्वी ठरले. निफ्टीच्या ५० कंपन्यांपैकी फक्त पाच कंपन्यांमध्येच दोन महिला संचालक होत्या. ५३ टक्के कंपन्यांच्या प्रवर्तकांनी हे नियम पाळण्यासाठी पत्नी किंवा अन्य नातेवाइकांना संचालक बनवले होते.
सर्वेक्षणानुसार, ७७ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाची संधी देण्यातही दुटप्पीपणा केल्याची तक्रार केली. ७६ टक्के महिलांच्या मते, गणित आणि विज्ञानात स्वाभाविकपणे पुरुष हुशार असतात. तर ६६ टक्के महिलांच्या मते, चांगले काम करूनही त्यांना कधीच उच्च पदाची जबाबदारी मिळाली नाही.

४१ टक्के महिला नोकरी सोडतात
या अहवालातील आकडेवारीनुसार तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये ४१ टक्के महिला १० वर्षांनंतर नोकरी सोडून देतात, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण १७ टक्केच असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...