आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणासाठी पेट्रोलपेक्षा नव्या डिझेल कार उत्तम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो (कॅनडा) - नव्या तंत्रज्ञानाच्या डिझेलवर चालणाऱ्या कार पेट्रोल कारच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात. डिझेलचे प्रदूषण आपल्याला दिसून येत असल्यामुळे डिझेलला कमी लेखण्यात येते. मात्र, पेट्रोलचे न दिसणारे प्रदूषण यापेक्षा जास्त हानिकारक असते. 
 
माँट्रियल विद्यापीठातील संशोधकांनी एका अभ्यास अहवालात हा दावा केला आहे. विद्यापीठातील सहायक प्रोफेसर पॅट्रिक हेयस यांनी ही माहिती दिली. या संशोधकांनी पेट्रोल आणि डिझेल कारमधून धुराच्या स्वरूपात निघणाऱ्या कार्बनयुक्त पार्टिकुलेट मॅटर (पीएम) चे विश्लेषण केले. हे कार्बनयुक्त पीएम ब्लॅक कार्बन, प्रायमरी ऑर्गेनिक एरोसोल, विशेष करून सेकंडरी ऑर्गेनिक एरोसोल (एसओए) पासून बनते. हा फुप्फुसासाठी नुकसानकारक असतो. हा अभ्यास अहवाल “जर्नल सायंटिफिक रिपोर्ट््स’मध्ये प्रकाशित झाला आहे.
 
पेट्रोलपेक्षा जास्त प्रदूषणाचे कारण : कमी तापमानादरम्यान पेट्रोल कारच्या प्रदूषणात होणाऱ्या वाढीचा संबंध कोल्ड स्टार्ट इफेक्टपेक्षा जास्त आहे. कमी तापमानामध्ये पेट्रोल इंजिन कमी इफिशियंट होते आणि त्याचा कॅटेलेटिक कन्व्हर्टरदेखील  स्टार्ट झालेला नसतो. जुन्या डिझेल कार, पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त प्रदूषण निर्माण करतात ही बाब खरी असून या जुन्या कारमध्ये पार्टिकल फिल्टर नसते, असा दावा या संशोधकांनी केला आहे. यामुळे डिझेल कार सामान्यपेक्षा जास्त नायट्रोजन ऑक्साइड सोडतात, जे स्मॉग आणि अॅसिड रेनचे कारण बनते.
 
नव्या डिझेल कारमध्ये असते पार्टिकल फिल्टर 
 युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये नव्या डिझेल कारमध्ये पार्टिकल फिल्टर लावणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे या अहवालात संशोधकांनी म्हटले अाहे. यामुळे डिझेल कारमुळे होणाऱ्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, तर पेट्रोल कार २२ अंश सेल्सियस तापमानात डिझेल कारच्या तुलनेत सरासरी १० पट जास्त कार्बनयुक्त पीएमचे उत्सर्जन करतात. शून्याच्या खाली सात अंश सेल्सियस तापमानात हे उत्सर्जन ६२ पट वाढते.
बातम्या आणखी आहेत...