आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश-नीता अंबानींंना होत नव्हते बाळ, या गायनाकॉलॉजिस्टमुळे लाभले अपत्यसुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंंबई- रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी समूहाची टेलिकॉम कंपनी जिओच्या लाँचिंगची घोषणा केली. 5 सप्टेंबरला याचा औपचारिक प्रारंभ होईल. यात पुढील महिने, 31 डिसेंबरपर्यंत मोफत सेवा मिळेल. जानेवारीपासून केवळ डाटाचे बिल येईल. रोमिंगसह सर्व व्हॉइस कॉल कायम मोफत असतील. डाटा प्लॅन 50Rs/GB पासून सुरू होईल.

भारत आता टेलिकॉम क्षेत्रात टॉप-10 देशांत दाखल होईल, असा दावा मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केला. या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासाठी अंबानी फॅमिलीशी संबंधित एक रोचक माहिती घेऊन आलो आहे. ती म्हणजे, मुकेश आणि नीता अंबानी यांना अपत्यसुख मिळणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. तेव्हा नीता अंबानी गायनाकॉलॉजिस्ट डॉ. फिरोजा पारिख यांच्या संपर्कात आल्या. त्यांच्यामुळेच अंबानी दांपत्याला जुळी मुले (आकाश व ईशा) नंतर आणखी पुत्रसुख (अनंंत) लाभले.

विशेेष म्हणजे, 2011 मध्ये पारिख यांनी लिहिलेल्या “द कंप्लिट गाइड टू बिकमिंग प्रेग्नंट’ पुस्तकाची प्रस्तावना नीता अंबानी यांनी लिहिली आहे.

चर्चेचे कारण...
आयव्हीएफ तंत्राद्वारे अभिनेता तुषार कपूरला अपत्यसुख मिळवून दिले. नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिच्या तिळ्या अपत्याच्या जन्मामागेही पारिख यांची वैद्यकीय कला होती. डॉ. राजेश पारिख यांच्याशी फिरोजा यांचा विवाह झाला.त्यांना तीन अपत्येही आहेत.

राजेश यांच्या कवीमनाने केले आकर्षीत
महाविद्यालयात राजेश यांच्या कविता लिहिण्याच्या छंदाने तसेच स्पष्टवक्तेपणाने फिरोजा खूपच आकर्षित झाल्या. डॉ. राजेश यांचे वडील डॉ. महेंद्र पारिख हे गायनाकॉलॉजिस्ट होते. फिरोजा यांनी त्यांच्यासोबत मिळून शस्त्रक्रिया केलेली आहे. फिरोजा यांची पारशी परंपरेशी नाळ जुळलेली असून फायर टेम्पलविषयी श्रद्धा आहे. पहिल्यांदा गर्भवती होत्या तेव्हा 1-2 महिन्यातून किमान एकदा तरी त्या मुंबईतील फायर टेम्पलमध्ये जात. एकदा त्यांच्या आई म्हणाल्या, अशा अवस्थेत तुझे त्या मंदिरात जाणे योग्य नाही. फिरोजा यांनी याचे कारण विचारताच आईने त्यांना त्या विवाहानंतर पारशी नसल्याची जाणीव करून दिली. तथापि, आईवडिलांनी कधीच त्यांच्या आंतरजातीय विवाहास विरोध केला नाही.

सातवीत असताना शिक्षिकेने वर्तवले होते भाकित
डॉक्टर बनण्यामागे त्यांची प्रेरणा जीवशास्त्राच्या शिक्षिका होत्या. शिक्षिका शाळेत फिरोजा यांना खास आजाराबाबत माहिती सांगायच्या. फिरोजा सातवीत असताना त्या शिक्षिकेने भविष्यात फिरोजा डॉक्टर बनेल, असे भाकीत वर्तवले होते.

आधुनिक तंत्रज्ञान केले अवगत
जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म चमत्कार मानला जात होता. त्या वेळी फिरोजा येलमध्ये इंटर्नशिप, तर राजेश हॉपकिन्समध्ये शिकत होते. तेव्हाच फिरोजा यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञान अवगत केले.

काश्मिरमधील क्लिनिक गेले वाहून
मागील १२ वर्षांपासून त्या दर महिन्याला नियमितपणे श्रीनगरला उपचार करण्यासाठी जातात. काश्मीरमध्ये मागच्या वर्षी महापुरात त्यांचे क्लिनिक वाहून गेले. आता त्या नव्या जोमाने कामाला लागल्या आहेत.

(फिरोजा पारिख यांनी “दिव्य मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार)

पुढील स्लाइडमध्ये पाहा, डॉ. फिरोजा यांच्यासंबंधीत काही निवडक फोटोज्...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...