आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहतुकीत १५% वाढ करणार : गडकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सागरी नाैकानयन आणि आंतरदेशीय जलवाहतूक विकास करण्यास केंद्र सरकारने प्राथमिकता दिली असून पुढील चार वर्षांत माल आणि प्रवासी जलवाहतुकीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा मानस केंद्रीय भूपृष्ठ अाणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला. सागरी किनारा नाैकानयन अाणि अांतरदेशीय जलवाहतूक क्षेत्रात चीन, दक्षिण कोरिया, संयुक्त राष्ट्रसंघ, जर्मनी, फ्रान्स इत्यादी राष्ट्रांच्या सरासरी ३० ते ४० टक्के वाटा असून भारताचा नगण्य म्हणजे तीन ते पाच टक्के वाटा अाहे. जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत टिकायचे असल्यास भारताने लॉजिस्टिक कॉस्टवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. असाेचेम या संस्थेने अायाेजित केलेल्या परिषदेत ते बाेलत हाेते. परिषदेला जहाज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, गौतम चॅटर्जी नौकानयन विभाग मुंबईचे महासंचालक दीपक शेट्टी, असोचेमचे अध्यक्ष सुनील कनोरिया उपस्थित होते. तसेच सरकारने सागरी किनाऱ्यालगतच्या नाैकानयनाच्या सेवाकरात शिथिलता आणली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...