आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारपासून सेव्हींग अकाऊंटवरील विड्रॉवल लिमिट संपणार, ग्राहकांना मिळणार दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारपासून बँकेतून रोख रक्कम काढण्यावरील मर्यादा संपणार आहेत. सध्या 50 हजारांची मर्यादा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन टप्प्यांत कॅथ विड्रॉवल लिमिट मागे घेणार असल्याचे सांगितले होते. आता उद्यापासून म्हणजे 13 मार्चपासून ही मर्यादा संपणार आहे. 

करंट अकाऊंटची मर्यादा 1 फेब्रुवारीपासूनच घेतली मागे 
- करंट अकाऊंटवरील ही मर्यादा 1 फेब्रुवारीपासूनच मागे घेण्यात आली आहे. ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडीट खात्यांतील विड्रॉवलची लिमीटही मागे घेण्यात आली आहे. 
- 1 फेब्रुवारीपासून एटीएममधून रोख रक्कम काढण्याची मर्यादाही मागे घेण्यात आली होती. पण त्यावेळीही सेव्हींग अकाऊंटवर 24 हजारांची मर्यादा कायम ठेवण्यात आली होती. 
- 20 फेब्रुवारीपासून ही मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आले. 
- नोटबंदीनंतर आरबीआयने पुरेशा प्रमाणात नव्या नोटा बँका आणि एटीएममध्ये पोहोचल्या नसल्याने कॅश विड्रॉवलवर मर्यादा आणल्या होत्या. 
- पण आता सर्व प्रकारच्या मर्यादा मागे घेण्यात आल्या आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...