आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Gold silver, Indians Are Investing Their Saving In Equities And Other Financial Instruments

सोने-चांदी- घर नव्हे, भारतीय लोक येथे गुंतवत आहेत आयुष्याची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात सोने-चांदी, घर अथवा हिर्‍याच्या दागिन्यांच्या गुंतवणुकीत कमालीची घट दिसून आली आहे. भारतीय लोकांचा कल आता स्मार्ट गुंतवणुकीकडे वाढला आहे. अलिकडे लोक शेअर मार्केट, FD तसेच बॉंडमध्ये मोठी गुंतवणूक करताना दिसत आहेत. 2015 मध्ये शेअर मार्केट, FD अथवा बॉंडमध्ये गुंतवणुकीत 19 टक्के ग्रोथ, तर सोने-चांदी, घर व हिर्‍यांच्या दागिन्यांच्या गुंतवणुकीत 2.5 टक्के घट दिसून आल्याचे 'कार्व्ही प्रायव्हेट वेल्‍थ'च्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

झपाट्याने बदलतोय ट्रेंड
- भारतीय लोक पारंपरिक रुढी-परंपरा मानतात, असे समजले जाते. त्यामळे भारतीय लोक सोने-चांदी, घर तसेच हिर्‍यांच्या दागिन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करतात.
- परंतु, आता ट्रेंड बदललेला आहे. लोक शेअर मार्केट, FD अथवा बॉंडसारख्या फायनान्शियल एसेट्समध्ये जास्त गुंतवणूक करताना दिसत आहेत.
- फिजिकल एसेट्समध्ये पैसा गुंतवणूक करण्याचा ट्रेंड चेंज झाला आहे.
- रिपोर्टनुसार 2015 मध्ये एकूण 57.25 टक्के लोकांनी फायन्शियल एसेट्समध्ये आपली आयुष्याची कमाई लावली होती.
- खासगी संपत्तीत 280 लाख कोटी रुपयांसोबत 8.9 टक्के ग्रोथ दिली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, भारतीय लोकांनी कोणत्या फिजिकल एसेट्समध्ये किती केली गुंतवणूक?