आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या पैशासंदर्भात अधिसूचना आठवड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : पन्नास टक्के कर देऊन काळा पैसा पांढरा करणाऱ्या योजनेची अधिसूचना या आठवड्यात आणण्याची सरकारची तयारी सुरू आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असे याचे नाव असेल. या योजनेअंतर्गत घोषित केलेल्या काळ्या पैशातून ५० टक्के रक्कम कर स्वरूपात मिळणार आहे.
यातील २५ टक्के रक्कम चार वर्षांसाठी गरीब कल्याण निधीत जमा होईल आणि उर्वरित २५ टक्के पैसा खर्चासाठी मिळणार आहे. गरीब कल्याण निधीमध्ये जमा रकमेवर व्याजही मिळणार नाही.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काळा पैशाचा फाॅरमॅट काय असेल, कराची रक्कम एकदाच जमा करावी लागेल की यासाठी हप्ते पाडून दिले जातील, योजनेचा कालावधी काय असेल या सर्वांची माहिती अधिसूचनेत असणार आहे.
या योजनेअंतर्गत काळा पैसा घोषित करणाऱ्यांना त्याचा स्रोत विचारला जाणार नाही. यावर वेल्थ टॅक्स, सिव्हिल आणि इतर कायद्यांतर्गत कारवाईही केली जाणार नाही. परंतु फेमा, मनी लाँडरिंग अॅक्ट, नारकोटिक्स आणि परदेशी काळा पैसा बाळगल्यासंबंधीच्या कायद्यानुसार कारवाई होणे शक्य आहे.
बातम्या आणखी आहेत...