आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरी वाढणार; आता किमान मजुरीत आईवडिलांचा खर्चही सामील करण्याचा प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली- किमान मजुरी निश्चित करण्याचा फॉर्म्युला बदलण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.  त्यामुळे श्रमिकांचे राष्ट्रीय स्तरावरील किमान वेतन दुप्पट होऊ शकते. 
सूत्रांच्या मते, श्रम व रोजगार मंत्रालय कामगाराच्या पत्नीसोबतच आईवडील, दोन अपत्यांचा वेगवेगळ्या घटकांच्या रूपात समावेश करण्याचा विचार करत आहे. सध्या किमान मजुरीत स्वत: कामगार, पत्नी आणि दोन अपत्यांचा समावेश असतो. दोन अपत्यांना एकच घटक मानले जाते. श्रमिकांना ३ व्यक्तींच्या पालनपोषणाइतकी किमान मजुरी मिळायला हवी. प्रस्ताव मंजूर झाल्यास मजुरी ६ घटकांच्या आधारे निश्चित होईल. यामुळे श्रमिकांचे वेतन दुपटीने वाढेल.
 
सध्या मजुरी अधिनियम १९४८ नुसार, ४७ उद्योग क्षेत्रांसाठी किमान मजुरी ठरवली जाते. यात कृषक आणि अकृषक क्षेत्राचाही समावेश आहे. केंद्र सरकारने मागच्या वर्षी अकृषक क्षेत्रातील श्रमिकांची किमान मजुरी दरमहा ९१०० रुपये केली होती. प्रस्तावित फॉर्म्युला अमलात आल्यास मजुरी दरमहा १८००० रुपयांवर जाईल. 
बातम्या आणखी आहेत...