आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसबीआय गृहकर्ज मिळेल ऑनलाइन, कर्ज प्रक्रियेची अडचण दूर करण्यासाठी नवा पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) कर्ज घेणे अधिक सोपे केले आहे. बँकेच्या वतीने आता गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइट https://onlineappy.sbi.co.in वर अर्ज करावा लागेल. त्यानंतर बँकेचे अधिकारी स्वत: तुमच्याशी संपर्क करून कर्जाची प्रक्रिया पूर्ण करतील. ही सुविधा बँक लवकरच मोबाइलवरदेखील उपलब्ध करून देणार आहेत.

कसा करणार अर्ज
ही नवी सुविधा एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी शुक्रवारी सुरू केली. या माध्यमातून गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्ज देण्यात येणार आहे. अर्जकर्ता https://onlineappy.sbi.co.in वर ऑनलाइन कर्जाचा अर्ज भरू शकतो. तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड करता येतील. यानंतर बँकेचे अधिकारी तुमच्याशी संपर्क करतील. या माध्यमातून तुमच्या कर्जाची मंजुरीची प्रक्रियादेखील पूर्ण होईल. त्यामुळे कर्ज घेण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.

मोबाइलवर सुविधा
बँक ही सुविधा लवकरच मोबाइलवर सुरू करण्याची तयारी करत आहे. या माध्यमातून तुम्ही मोबाइलवरूनदेखील अर्ज करू शकता. त्यामुळे मोबाइलवरूनही गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता येईल.

ई-अॅप्रूव्हलची सुविधा
या योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या कर्जाची मंजुरी (ई-अॅप्रूव्हल) ऑनलाइन मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करताना तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...