आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांनो लक्ष द्या...आता रेल्वे एक्स्प्रेसमध्ये करता येईल विवाह, हनिमूनचीही सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- तुम्ही अविवाहात आहात आणि शाही विवाहाचे स्वप्न पाहात असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुम्ही चालत्या-फिरत्या महालात शाही थाटात विवाह करू शकता. आयआरसीटीसीने (IRCTC) आता शाही एक्स्प्रेस 'महाराजा'मध्ये विवाह करण्याची संधी उपलब्ध करून ‍दिली आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा व्हायची आहे.

अशी आहे महाराजा एक्स्प्रेस...
- आयआरसीटीसीद्वारा आलिशान महाराजा एक्स्प्रेसचे संचालन केले जाते.
- महाराजा एक्स्प्रेस दिल्लीहून आठ दिवसांच्या प्रवासावर निघते. प्रवाशांत ती आग्रा, रणथंबौर, जयपूर, बिकानेर, जोधपूर व उदयपूर शहरांना भेटी देते.
- याशिवाय अनेक राज्यांद्वारा पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडेसी, गोल्डन चेरियट आणि रॉयल राजस्थान शाही एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातात.
- पर्यटन क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता देशातील प्रवाशांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याचे आयआरसीटीसीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
- पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी 1982 पासून या शाही गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. पैलेस ऑन व्हील्सच्या रुपात पहिली आलिशान एक्स्प्रेस धावली होती.
- शाही एक्स्प्रेस गाड्यांचे कोच अत्याधुनिक सुविधांनी अद्ययावत आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, 'महाराजा'मध्ये प्रवाशांसाठी काय असेल सुविधा...
बातम्या आणखी आहेत...