आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएसईचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लिमयेंना आठ कोटींचे पॅकेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांना वार्षिक ८ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. एनएसईच्या वतीने ३ फेब्रुवारीला त्यांच्या निवडीची घोषणा झाली होती.   

पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती, पॅकेज ठरवण्यासाठी आणि त्याला मंजुरी देण्यासाठी ७ मार्चला बैठक बोलावण्यात आली आहे. नियुक्तीला सेबीची मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लिमये सध्या आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्याकडे बँक, वित्तीय संस्था आणि अकाउंटिंग फर्मचे काम करण्याचा २५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. २००५ पासून ते आयडीएफसीमध्ये आहेत. लिमये यांचे पॅकेज दोन हिश्श्यात असेल. यात ठराविक आणि अस्थिर वेतन असे दोन प्रकार असतील. ठराविक वेतन ६ कोटी आणि अस्थिर वेतनात २ कोटींचे असेल. याचाच अर्थ अस्थिर वेतन ठराविक रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल. कामाच्या आधारावर ही वेतनश्रेणी ठरणार आहे. त्यांची कामगिरी तपासण्याचे पाच स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...