आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदी : अधिकाऱ्यांनी अद्याप अर्थसंकल्पीय कामाला सुरुवातच केलेली नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटाबंदीचा परिणाम अर्थसंकल्पाच्या तयारीवरदेखील झाला आहे. डिसेंबर महिन्यातील पूर्ण आठवडा गेला असला तरी अद्याप अर्थसंकल्पावर काम सुरूच झालेले नाही. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नोटाबंदी मोठे ‘गेमचेंजर’ ठरेल असे आम्हाला वाटले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या अडचणी पाहता अद्याप अर्थसंकल्पावर कामच सुरू झाले नसल्याचे अर्थसंकल्पाच्या तयारीत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात विकास दर रिझर्व्ह बँकेने केलेल्या दुरुस्तीच्या म्हणजेच ७.१ टक्क्यांपेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारचा तोटाही वाढू शकतो. १००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर आर्थिक घडामोडींमध्ये काही दिवस मंदी येण्याची अपेक्षा आधीच व्यक्त करण्यात आली होती. मात्र, सध्या अनेक कंपन्यांना अापल्या कर्मचाऱ्यांना पगार देता येत नाहीत, पुरवठादारांना पैसे देता येत नाहीत, लोक महिन्यानंतरही एटीएम आणि बँकेबाहेर रांगेत उभे आहेत ही परिस्थिती पाहता ही मंदी अजून बराच काळ राहण्याची शक्यता वाटत असल्याचे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारचा महसूल ३५,००० कोटी रुपयांपेक्षाही कमी राहण्याची शक्यता असल्याचे मत सरकारच्या सल्लागारातील एक असलेले एनआयपीएफपीचे अर्थतज्ज्ञ एन. आर. भानुमूर्ती यांनी व्यक्त केले. सध्या आपण अनिश्चित काळात आहोत. सरकारचा महसूल आणि नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम यांचा अभ्यास करावा लागणार आहे. पुढील तिमाहीमध्ये जीडीपी विकास दर गेल्या वेळच्या अंदाजापेक्षा दाेन टक्के कमी म्हणजे ५.५ टक्के राहण्याचा अंदाज एचएसबीसी इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी व्यक्त केले आहे. एप्रिलमध्ये परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता असली तरी ७.५ टक्के विकास दर साध्य करण्यासाठी
वेळ लागेल.

निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट अवघड
सरकारने या वर्षी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५६,५०० कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, आतापर्यंत यातील अर्धी रक्कम देखील जमा करण्यात सरकारला यश आलेले नाही. शेअर बाजारात सध्या असलेली अनिश्चितता पाहता या वर्षी हे उद्दिष्ट साध्य करणे अवघड वाटत आहे.
बातम्या आणखी आहेत...