आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या घरात आहे खजिना, जुने नाणे विकून एका रात्रीत बनू शकता करोडपती!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्याकडे जुने व युनिक नाणे आहेत का? असतील तर तुमची लॉटरी लागली असे समजा. तुम्ही जुने नाणे विकून एका रात्रीत करोडपती बनू शकतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. मात्र हे खरे आहे.

जुनी व युनिक नाण्यांचा संग्रह करणारे लोक अशा नाण्यांवर लक्ष ठेवून असतात. युनिक नाणे दिसले रे दिसले की, ते त्यासाठी कोट्यवधी रुपयेही मोजण्यात तयार असतात.
मात्र, जगात बहुतांशी लोक असे आहेत की, त्यांना जुन्या नाण्यांचे मुल्य (व्हॅल्‍यू) माहीत नसते. काही लोक तर जुनी नाणे भंगारात देऊन मोकळे होतात. मात्र, जुने नाणे 'ऑक्शन वेबसाइट' अथवा विदेशी क्वॉइन मार्केटमध्ये विकून लाखों रुपये कमावता येतो.

4 लाख रुपयांत विक्री झाले 100 रुपयांचे नाणे
भारत सरकारने 1981 मध्ये 100, 150 रुपयांचे सिल्व्हर क्वॉइन चलनात आणले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही नाणे बंद केले होते. त्यामुळे क्वॉइन कलेक्टर या जुन्या नाण्यासाठी 40 हजार रुपये ते 4 लाख रुपयांपर्यंत मोजण्यास तयार आहेत. सध्या हे नाणे मार्केटमध्ये फारसे दिसत नाही. मात्र, तुमच्याकडे जर 100 व 150 रुपयांचे जुने नाणे असेल तर ते विकून तुम्ही देखील चांगला मोबदला मिळवू शकतात. क्वाइन कलेक्टर आलोक गोयल यांनी 100 रुपयांचे सिल्व्हर क्वॉइन नुकतेच 4 लाख रुपयांना विकले.

पुढील स्लाइडवर वाचा, 6 लाख रुपयांत विकले गेले ब्रिटिशकालीन नाणे...
(टीप: छायाचित्रांचा वापर सादरीकरण्‍यासाठी करण्‍यात आला आहे.)
बातम्या आणखी आहेत...