आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीत उघडली सर्वाधिक बँक खाती; दोन महिन्यांत उघडली एक कोटी २३ लाख खाती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटाबंदीत सर्वाधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील आठ बँकांनी दोन महिन्यांत एक कोटी २३ लाख २१ हजार ५२८ खाती उघडली. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे. २० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना गेल्या दोन वर्षांतील दर महिन्याला उघडण्यात आलेल्या खात्यांची संख्या विचारण्यात आली होती. यातील आठ बँकांनी खात्यांची संख्या सांगितली. यात युनियन बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक अाॅफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक व देना बँक यांचा समावेश आहे. २०० पानांच्या या कागदपत्रानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर दरम्यान तुलनेत सर्वाधिक जन-धन, बचत व चालू खाते उघडण्यात आली.  

अर्धवट माहिती  : कॅनरा बँक, एसबीआय, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, युनायटेड बँक, अलाहाबाद बँकेने साधनांचा वापर व वेळेचा हवाला माहिती दिली नाही. आंध्रा बँक, बँक ऑफ इंडिया व विजया बँकेने अर्धवट माहिती दिली. पंजाब अँड सिंध बँक, युको बँकेने उत्तरच दिले नाही. 
 
पुढील स्‍लाईड वर पहा, २०१६ च्या सहा महिन्यांत आठ बँकेतील नवी खाती
बातम्या आणखी आहेत...