आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगावला कांद्यास २६५३ रु. क्विंटल भाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव- लासलगाव बाजार समितीत मंगळवारी कांद्यास या हंगामातील सर्वाधिक २६५३ रुपये क्विंटल भाव मिळाला. अावक घटल्याने भावात सुधारणा झाली अाहे. शेतकऱ्यांनी माेठ्या कष्टाने पिकवून साठवलेल्या चाळीतील कांद्यास चांगला भाव मिळत असला, तरी शेतकरी समाधानी नाहीत. त्यांना भाव वाढण्याची अजून अपेक्षा अाहे.

साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी अापल्या शेतातून काढलेला कांदा गारपिटीत सापडला हाेता. जाे कांदा शिल्लक हाेता ताे साठवला. कांदा जाळीत साठवल्याने त्याचे वजन घटले असून मालही खराब झाला अाहे. अशा परिस्थितीत जेमतेम राहिलेला कांदा बाजारात विक्रीस अाणला अाहे. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत अत्यल्प कांद्याची अावक हाेती.

मूल्य वाढूनही भाववाढ : निर्यातमूल्यात केंद्राने वाढ करूनही भाव घसरतील अशी परिस्थिती असताना देशांतर्गत वाढलेली मागणी व घटलेली अावक यामुळे कांदा चांगला भाव घेत अाहे. निर्यातमूल्याचा यावर काहीही परिणाम दिसून येत नाही.

तीन हजारांची शक्यता : जिल्हाभरात उन्हाळी कांद्याची अावक राेडावली अाहे. अावक कमी झाल्याने भावात वाढ झाली असून अजूनही ४० ते ४५ टक्के कांदा शिल्लक अाहे. शेतकरी भाववाढीबाबतचा अंदाज घेऊन कांदा विक्रीस अाणत अाहे. सध्या उन्हाळी कांद्याला मिळत असलेला भाव पाहता कांदा तीन हजार रुपयांचा भाव अाेलांडण्याची शक्यता अाहे. मंगळवारी चांगल्या कांद्याने २६०० रुपयांपर्यंत मजल मारली.

अावक कमी : मागील वर्षी लासलगाव बाजार समितीत जुलै महिन्यात दाेन लाख ३५ हजार ४५९ क्विंटल कांद्याची अावक झाली हाेती. या वर्षी मात्र २१ जुलैपर्यंत एक लाख ४३ हजार ८५ क्विंटल कांद्याची अावक झाली अाहे.
हा भावही न परवडणारा
- माेठ्या मेहनतीने तयार केलेला कांदा अाता विक्रीस अाला अाहे. जेमतेम कांदा शिल्लक राहिलेला अाहे. वजनही घटले अाहे. अाज जरी जास्त भाव मिळला असला, तरी कांद्याचे हे भावही शेतकऱ्यांना न परवडणारे अाहेत. -मनाेज रेदासनी, व्यापारी, लासलगाव
तरीही भाव कमीच...
- उन्हाळी कांद्याचा उत्पादन खर्च वाढला अाहे. मजुरी महाग झाली अाहे. इतके िदवस कांद्याला कमी भाव हाेता. अगाेदर कमी भावात कांदा विक्री केला. त्यामुळे सध्या मिळत असलेला भाव हा खर्चाचा विचार करता न परवडणारा अाहे. त्यामुळे हे भाव तसे कमीच अाहेत. -बाळासाहेब गायकवाड, शेतकरी
बातम्या आणखी आहेत...