आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळी कांद्याच्या सरासरी भावात सर्वाधिक घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वर्षाचे खात्रीशीर उत्पन्न समजल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला यंदा गेल्या ५ वर्षांतील सर्वात कमी भाव मिळत आहे.  लासलगावमध्ये एप्रिलमधील कांद्याचे सरासरी भाव ५७३ रुपये क्विंटल आहे.  पिंपळगावात किमान भाव २५४ रुपये क्विंटल एवढा खाली घसरला आहे. २०१४ मध्ये पिंपळगावमध्ये किमान भाव २२२ रुपयांवर पोहोचले होते.   
 
एप्रिल २०१७ मध्ये लासलगाव बाजारात १,३७ ५२० क्विंटल कांद्याची आवक झाली. यासाठी किमान ३४६ रुपये क्विंटल, तर कमाल ६४९ रुपये भाव मिळाले. क्विंटलमागे हा भाव सरासरी ५७३ रुपये आहे. याआधी एप्रिल २०१६ मध्ये ७७९, एप्रिल २०१५ मध्ये १ हजार ९३, २०१४ मध्ये ८८८ रुपये क्विंटल, तर २०१३ मध्ये ८३८ रुपये भाव मिळाला.

पिंपळगाव बाजारातही २०१३ ते २०१६ या ४ वर्षांत अनुक्रमे ८०९ रुपये, ७४८ रुपये, १०२२ रुपये आणि ७३६ रुपये क्विंटल असा भाव राहिला होता. यंदा एप्रिलमध्ये मात्र पिंपळगावात उन्हाळी कांद्याचा किमान भाव २५४ रुपये क्विंटल, कमाल भाव ७३३ रुपये आणि सरासरी भाव ५७७ रुपये क्विंटल आहे.   
 
कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे बाजार समितीतील आवकही घटली आहे. लासलगावमध्ये या महिन्यात १ लाख ३७ हजार ५२० क्विंटल आवक झाली, तर पिंपळगावमध्ये ७४०८८ कांद्याची आवक झाली. एप्रिल २०१५ मध्ये ३ लाख ५१ हजार १२४, तर २०१६ मध्ये २ लाख ५० हजार ७४२ क्विंटल कांद्याची आवक होती. २०१७ मध्ये त्यात निम्म्याने घट झाली आहे.   
 
घसरणीमागे सरकारचे धोरण जबाबदार  
कांद्याचे भाव कोसळण्यामागे सरकारचे धोरण जबाबदार आहे. कोणत्याही पिकाचे उत्पादन  रात्रीत येत नसते.  सरकारकडे  पिकाची लागवड, अंदाजे उत्पादन, स्थानिक मागणी व निर्यातीच्या शक्यतेची आकडेवारी असते.  यंदा प्रत्येक पिकाचे दुपटीने उत्पादन झाले. जुना लाल कांदा अद्याप मार्केटमधून उचलला नसल्याने उन्हाळी कांद्याला भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची सूचना आहे.
- नानासाहेब पाटील ,संचालक, नाफेड  
 
बातम्या आणखी आहेत...