आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमी भाव केंद्रावर कापूस, सोयाबीन, उडीद मुगाच्या विक्रीसाठी अाता अाॅनलाइन बुकिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- शेतामध्ये अतोनात कष्ट करून शेतकरी पीक घेताे. निसर्गाची साथ मिळाल्यास त्याला घेतलेल्या पिकातून उत्पादन मिळवता येते. मात्र, शासनाचे हमीभाव केंद्राच्या परिसरात दिवसेंदिवस ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राच्या परिसरात घरापासून दूर अंतरावर माल विक्रीसाठी अडकून पडल्याचे चित्र अनेकदा दिसून अालेले अाहे. यंदाच्या वर्षापासून मात्र हे चित्र पालटले अाहे. राज्य शासनाने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी अाता शेतकऱ्यांना अाॅनलाइन बुकिंग (नोंदणी) करावी लागणार अाहे. त्यानंतर नाफेडद्वारे शेतकऱ्याच्या मोबाइलवर एसएमएस येईल अाणि शेतकरी स्वत:चा माल सन्मानाने व विना अडचण विक्री करू शकणार अाहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गाेड हाेणार अाहे.  

बीड जिल्ह्यामध्ये कापसाचे उत्पादन माेठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन पिकाकडे शेतकरी माेठ्या प्रमाणावर वळलेला अाहे. सरासरी कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या महत्त्वाच्या पिकांतून शेतकरी अार्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसून येताे. मागील वर्षी बीड जिल्ह्यात शासनाच्या हमीभावापेक्षा कापसाचे व्यापाऱ्यांकडे भाव अधिक असल्याने शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राची अनावश्यकता निर्माण झालीच नाही. अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांचा शासनाने हमीभाव केंद्र सुरू करावे अशी मागणी असते. त्यानुसार बीड तालुका बाजार समितीने मागील वर्षी सरासरी उडीद ९९ हजार क्विंटल, मूग एक हजार ७०० क्विंटल, सोयाबीन एक हजार ४०० क्विंटलची खरेदी केली हाेती. हा माल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना माल घेऊन ऊन, वारा पावसाची पर्वा न करता केंद्रांच्या बाहेर थांबावे लागले हाेते. यंदा मात्र राज्य शासनाने वरील पिकांची शेतकऱ्यांनी अाॅनलाइन नोंदणी करून एसएमएस अाल्यानंतर माल विक्रीला अाणण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारच्या खर्चात बचत हाेणार अाहे. तसेच शेतकऱ्यांची यासाठी लागणाऱ्या वेळेचेही बचत हाेणार अाहे. 
 
अशा प्रकारे करावी लागेल नोंदणी शासनाद्वारे तालुका खरेदी-विक्री संस्थांच्या प्रतिनिधीमार्फत त्यांच्या कार्यालयात किंवा तालुका खरेदी- विक्री केंद्राच्या प्रतिनिधीमार्फत बाजार समिती कार्यालयात शेतकऱ्यांना अाॅनलाइन नोंदणी करता येणार अाहे. यासाठी शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातील पीकपेरा क्षेत्रानुसार ७/१२ च्या उताऱ्याची मूळ प्रत, चालू हंगामातील पेरापत्रक, आधार कार्ड, बँक खाते पासबुकची झेरॉक्स, मोबाइल क्रमांक आदी माहिती देऊन अाॅनलाइन नोंदणी करावी लागणार अाहे.
  
एसएमएस अाणि अन्य सुविधा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रतिनिधीमार्फत आधारभूत किमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना माल आणण्याबाबत तालुका खरेदी-विक्रीमार्फत एसएमएसद्वारे संबंधित शेतकऱ्यांना कळवण्यात येणार आहे. मार्केटिंग अधिकाऱ्यातर्फे तालुका खरेदी विक्री सेवा सहकारी संस्थांच्या  कार्यालयातील संगणकात व खरेदी-विक्री व्यवस्थापक यांच्या मोबाइलमध्ये नाफेडद्वारा पुरवण्यात आलेली अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

चांगला कापूस व त्याचे दर
शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा दर्जेदार कापूस बाजारपेठेत आणावा. चांगल्या प्रतीचा कापूस माफक आर्द्रतायुक्त असावा याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. दर्जेदार कापसाची हमीभावाने खरेदी केली जाईल. केंद्राच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापसाच्या विविध जातींचे दर जाहीर केले आहेत. यात ब्रह्मा जातीच्या कापसाला ४ हजार ३२० रुपये प्रतिक्विंटल, एच-६ जातीच्या कापसाला ४ हजार २२०  रुपये प्रतिक्विंटल, एलआरए जातीच्या कापसाला ४ हजार १२० रुपये प्रतिक्विंटल असे दर जाहीर केले आहेत.  

उत्पादकता घटण्याची शक्यता 
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील पिकांचा पेरा चांगल्या प्रमाणात झालेला अाहे, मात्र पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने काही ठिकाणच्या शेतीमालाच्या उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे शेती पिकाची उत्पादकता घटण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  

१८ ऑक्टोबरला नोंदणी सुरू  
बीड तालुका बाजार समितीअंतर्गत सोयाबीनची अाॅनलाइन नाेंदणीची प्रक्रिया १८ अाॅक्टाेबर २०१७ पासून सुरू झाली अाहे. कापूस, उडीद, मूग, तूर या पिकांचीही नोंदणी करणे शक्य अाहे. शेतकऱ्यांनी समितीची संपर्क साधावा.  
- अशाेक वाघिरी, सचिव, बाजार समिती.
बातम्या आणखी आहेत...