आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन किराणा खरेदीत दरवर्षी 62 टक्क्यांची वाढ; 15 ते 20 टक्के पैशाची बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून मोबाइल फोन आणि कपडेच नाही तर, किराणा सामानाचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री सुरू अाहे. छोट्या शहरातदेखील नागरिक किराणा दुकानात जाण्याऐवजी ऑनलाइन वस्तू मागवण्यास प्राधान्य देत आहेत. वाढती मागणी पाहता या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची संख्यादेखील वाढत आहे.

वास्तविक यातील काही कंपन्या फक्त महानगरातच सेवा देतात. तरी यातील काही कंपन्या टिअर-२ आणि टिअर-३ श्रेणीतील छोट्या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्या स्वत: किराणा वस्तू खरेदी करून त्यांचा पुरवठा करतात तर काही त्या- त्या परिसरातील दुकानदारांचे नेटवर्क बनवत आहेत. तसेच या दुकानांच्या माध्यमातून ते मालाचा पुरवठा करतात. उद्योग संघटन अॅसोचेम आणि पीडब्लूसीच्या वतीने करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या अहवालात ही माहिती मिळाली आहे.

या क्षेत्रात बिग बास्केट, ग्रोफर्स, आस्कमी ग्रोसरी सारख्या मोठ्या कंपन्याबरोबरच काही छोट्या कंपन्यादेखील समोर येत आहे. मोठ्या कंपन्या त्यांच्या नेटवर्कचा विस्तार करत आहेत.

सध्या देशातील २७ शहरांत आस्कमी ग्रोसरी काम करत असल्याचे कंपनीचे संस्थापक अंकित जैन यांनी सांगितले. मार्चपर्यंत आणखी ७५ शहरांत विस्तारीकरणाची योजना कंपनीने तयार केली आहे. व्यवसायात वाढ करण्यासाठी कंपन्यांनी आरोग्य, ब्रेकफास्ट आणि पार्टी असे विविध विभागदेखील तयार केले आहेत. ऑनलाइन ग्रोसरी खरेदी करण्यामध्ये बंगळुरू सर्वात पुढे असून त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचा नंबर लागतो.

> ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत वाढ
> १५ ते २० टक्के डिस्काउंट
> वेळ आणि पैशाची बचत
> स्मार्टफोन आणि इंटरनेटची सहज उपलब्धता

१.२ लाख कोटींचा होईल बाजार
याअहवालानुसार २०१६ ते २०२२ दरम्यान ऑनलाइन ग्राेसरी व्यवसाय दरवर्षी ६२ टक्क्यांनी वाढेल. पूर्ण ई-कॉमर्स बाजार २०२२ मध्ये ६.६ लाख कोटी रुपयांचा होणार आहे. यामध्ये ऑनलाइन ग्रोसरी १.२ लाख कोटी रुपये असेल.

असे काम करते नेटवर्क
अनेककंपन्यांकडे स्वत:चे वेअरहाऊस िकंवा स्वत:ची उत्पादने नाहीत. यासाठी त्यांनी तीन ते चार स्थानिक दुकानदारांसोबत नेटवर्क बनवले आहे. ज्या परिसरातून ग्राहकाची मागणी अाली, त्या परिसरातील दुकानदार सामान पोहाेचवतो. त्यामुळे दोन ते चार तासांत वस्तू पोहाेचते. या मुळे देखील ग्राहक या क्षेत्राकडे आकर्षित होत आहे.

वाढीची कारणे
> डिसेंबरमध्ये संजीव गोयनका समूहच्या स्पेंसर्स रिटेलने मेराग्रॉसरची खरेदी केली.
> एकस्पॉट डॉट कॉमला गोदरेज समूहाच्या नेचर्स बास्केटने खरेदी केले.
> महिंद्रा समूहाच्या बेबीओए डॉट कॉमने नेस्ट चाइल्डकेअरची खरेदी केली.