आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा गडगडून १० रुपये किलोवर, शेतकऱ्यांचा नफा घटून आला ४ ते ५ रुपयांवरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन कांदा आल्यामुळे घाऊक भाव गडगडले. लासलगावात कांदा १० ते १४ रुपये किलोवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा नफा ४ ते ५ रुपयांवरच आला. ऑगस्टमध्ये लासलगावमध्ये कांद्याने ५७ रुपये किलोचा दर गाठला होता. तेव्हा किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये किलो होता.

नाशकातील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेनुसार, १५ नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. तथापि, यंदा खरिपात लागवड कमी झाल्याने उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. संस्थेचे संचालक आर.पी. गुप्ता म्हणाले, सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ८-९ रुपये किलो आहे. भाव गडगडल्याने त्यांचा नफा घटला आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानातून मोठी आवक होत आहे.
एमईपी कमी करा
कांद्याचे किमान निर्यातमूल्य (एमईपी) रद्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रीय कृषी मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, निर्यात वाढल्याने शेतकऱ्यांचा फायदाच होईल. देशातील भाववाढ रोखण्यासाठी केंद्राने ऑगस्टमध्ये कांद्याचा एमईपी ४२५ डॉलर्सवरून ७०० डॉलर्स केला होता. यंदा मे-ऑगस्टमध्ये देशातून ४.५९ लाख टन कांद्याची निर्यात झाली.